Dhairyasheel Mohite Patil-Ranjitshinh Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil-Ranjitshinh Mohite PatilSarkarnama

Madha Lok Sabha : माढ्यात सहापर्यंत 60 टक्के मतदान; माणमध्ये रात्री साडेआठपर्यंत मतदान, टक्केवारी वाढणार

Lok Sabha Election 2024 : माढा मतदारसंघातील फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23 टक्के मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माढ्यात 63.8 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे सहापर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 3.58 टक्के मते घटल्याचे दिसून येते.

Solapur, 08 May : मोहिते पाटील यांच्या बंडामुळे राज्यात सर्वाधिक प्रतिष्ठेचा बनलेल्या माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात चुरशीने झाली. सायंकाळी सहापर्यंत 60 टक्के मतदान झाले आहे. माण आणि फलटणमध्ये रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. विशेषतः माणमध्ये रात्री साडेआठपर्यंत मतदान सुरू होते, त्यामुळे या टक्केवारी वाढ होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Constituency) फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23 टक्के मतदान झाले आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माढ्यात 63.8 टक्के मतदान झाले होते, त्यामुळे सहापर्यंतच्या आकडेवारीनुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 3.58 टक्के मते घटल्याचे दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil-Ranjitshinh Mohite Patil
Solapur Lok Sabha 2024 : सोलापुरात घटला मतदानाचा टक्का; 2019 मध्ये 58.45 तर यंदा 57.46 टक्के मतदान

भाजपने (BJP) तिकीट नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitshinh Mohite Patil) यांना आव्हान दिले, त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात फलटण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 64.23 टक्के, सर्वात कमी मतदान हे करमाळा मतदारसंघात 55 टक्के झाले आहे. फलटणखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या माढा विधानसभा मतदारसंघात 61.13 टक्के मतदान झाले आहे.

उत्तम जानकर आणि मोहिते पाटील युतीमुळे सर्वाधिक चर्चेत असलेल्या आणि मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या माळशिरस मतदार संघात 60.28% मतदान झाले आहे. शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात 59.94% एवढे मतदान झाले आहे, तर माणमध्ये 58.42 टक्के मतदानाची नोंद सहापर्यंत झाली होती. याच माणमध्ये रात्री साडेआठपर्यंत मतदान सुरू होते. त्यामुळे या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माढा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत 63.58 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्याला मोदी लाट व भाजपसाठी असणारे अनुकूल वातावरण यामुळे मागच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून येते. मागील निवडणुकीच्या तुलनेत सायंकाळच्या आकडेवारीनुसार यंदा 3.58% घट झाली आहे, त्यामुळे घटलेला टक्का कोणाच्या अंगलट येणार हे पाण्यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com