Raju Shetti: व्हिडिओ शेअर करीत राजू शेट्टींनी मानले अंबानी परिवाराचे आभार

Raju Shetti Thanks Ambani Family: गेल्या काही दिवसांपासून नांदणी मठाची महाराणी उर्फ माधुरी हत्तीणी ही चर्चेचा विषय बनली होती. नांदणी मठातील महाराणी हत्तीणीच्या विषयी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.
farmer leader Raju Shetti video thanking Mukesh Ambani
farmer leader Raju Shetti video thanking Mukesh AmbaniSarkarnama
Published on
Updated on

Mahadevi Elephant Latest News: वनतारा येथून महादेवी हत्तीण लवकरच नांदणी येथे येणार आहे. त्यामुळे कोल्हापुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोल्हापूरकरांच्या रोषानंतर वनताराकडून कोल्हापूरच्या नागरिकांची माफी मागितली आहे.

कोल्हापूरकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावरही पदयात्रा काढली होती.राजू शेट्टी यांनी व्हिडिओ शेअर करीत अनंत अंबानी आणि अंबानी परिवार यांचे आभार मानले आहे. महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

लोकभावना, मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण यांचा आदर करत वनताराने एक समन्वय साधणारा तोडगा काढला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो', असं म्हणत त्यांनी अंबानी कुटुंबाचे आभार मानले आहेत. अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी (माधुरी) हत्तीणी संदर्भातील वाद-विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

राजू शेट्टी यांनी काय म्हटलं

'आम्ही जैन समाजाचे आहोत आणि ‘जिओ और जिने दो’ या तत्त्वावर जगतो. माधुरी हत्तीच्या छळाचा आरोप 'पेटा'ने आमच्यावर केला, जो आम्हाला सहन झाला नाही. जीव, जंतू आणि प्राण्यांविषयी आमचं प्रेम असल्याने हे आरोप वेदनादायक होते. त्यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता. मात्र आता जो तोडगा निघाला आहे, तो स्वागतार्ह आहे आणि शेवट आनंददायक ठरतो आहे.'

farmer leader Raju Shetti video thanking Mukesh Ambani
Supreme Court Slams ED: कायद्याच्या चौकटीत राहा! गुंडासारखं वागू नका; सुप्रीम कोर्टानं EDला फटकारलं

महादेवी प्रकरण कोर्टात गेले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ‘महादेवी’ हत्तीणीला ज्या ‘वनतारा’मध्ये नेण्यात आले, त्या ‘वनतारा’च्या पथकाने दुसऱ्यांदा कोल्हापूरात येऊन लोकभावनांचा आदर करत अधिक सोयीसुविधा उभारून ‘महादेवी’ हत्तीणीला परत आणण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. महादेवी पुन्हा नांदणी मठात परतणार आहे.

farmer leader Raju Shetti video thanking Mukesh Ambani
Gadchiroli's Transformation story: आरआर आबांची एंट्री गडचिरोलीसाठी ठरली टर्निंग पॉईंट!

कोल्हापूरकरांची माफी मागितल्यानंतर ‘वनतारा’ची टीम बुधवारी पुन्हा कोल्हापुरात दाखल झाली होती. ‘वनतारा’चे पदाधिकारी, सीईओ यांनी कोल्हापुरातील दिगंबर जैन बोर्डिंग येथे नांदणी मठाचे मठाधिपती, लोकप्रतिनिधींशी चर्चा केली.

बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर नांदणी मठाचे मठाधिपती आणि ‘वनतारा’चे सीईओ विवान कराणी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

Q1. माधुरी हत्तीणीचा मुद्दा का चर्चेत आला होता?
नांदणी मठातील हत्तीणीच्या हस्तांतरणावरून वाद निर्माण झाला होता.

Q2. कोल्हापुरात नागरिकांनी काय आंदोलन केलं?
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रा काढली गेली.

Q3. वनताराने काय भूमिका घेतली?
वनताराकडून कोल्हापुरकरांची माफी मागण्यात आली.

Q4. वादाचा शेवट कसा झाला?
राजू शेट्टी यांनी वाद संपल्याची घोषणा करत अंबानी कुटुंबाचे आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com