Loan Waiver News : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. सरकारने जाहीर केलेली मदत मिळत नसल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांनी केली होती. त्यातच सर्व शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला होता. राज्यसरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
या अधिवेशनात शेतकऱ्यांना गूड न्यूज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या थकबाकीची माहिती सरकारकडून बँकांकडून मागवण्यात आली आहे. कर्जमाफीसाठी ही हालचाल असल्याची चर्चा आहे.
सरकारकडून जून 2025 पर्यंतच्या थकबाकीची माहिती बँकांकडून घेतली जात आहे.तब्बल 74 हजार शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारच्या पोर्टलवर अपडेट करण्यात आली असून इतर शेतकऱ्यांची माहिती देखील अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी बँकांकडून माहिती घेण्यात येत आहे.
शेतकरी फक्त बँकांकडून नव्हे तर जिल्हातील सरकारी सोसायटी, तसेच माध्यमातून कर्ज घेत असतात. त्यामुळे सेवा सोसायटीचे सचिव, बँकांचे तपास अधिकारी, शाखा अधिकारी यांच्याकडून थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे.
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 23 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सहा मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडतील. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात कर्जमाफी विषयी घोषणा होणार का याची उत्सुकता असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.