Shakteepeth Highway : 'ड्रीम प्रोजक्ट' ठरतोय फडणवीसांची डोकेदुखी : अधिवेशनात विरोधकांच्या मदतीला 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फौज

Maharashtra Monsoon Session 2025 : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
Farmers from 12 districts stage road blockades protesting against land acquisition for the proposed Nagpur-Goa Shaktipeeth Expressway.
Farmers from 12 districts stage road blockades protesting against land acquisition for the proposed Nagpur-Goa Shaktipeeth Expressway.sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Monsoon Session 2025 : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून आज (1 जुलै) हा अधिवेशनाचा दुसराच दिवस आहे. काल (30 जून) पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव सादर झाल्यानंतर कामकाज थांबवण्यात आले होते. पण अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्ग सरकारची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. आजपासून राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी या महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलनाची सुरुवात झाली आहे.

नागपूर-गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी दिनीच राज्यातील 12 जिल्ह्यातील शेतकरी चक्काजाम आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. पर्यायी महामार्ग आणि रस्ते असताना राज्याला कर्जबाजारी आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग तत्काळ रद्द करावा, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. कोल्हापूरमध्येही पुणे-बंगळूरू महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे.

अधिवेशनाच्या पूर्णवेळ कामकाजाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरु केले आहे. कोल्हापूर, सांगली, हिंगोली, परभणीसह 12 जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरमध्ये तर आंदोलनकर्त्यांनी पंचगंगा नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी प्रसंगावधान राखत आत्महत्या करायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले. विधानभवनाच्या बाहेरही आमदार सतेज पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील आमदारांनीही आंदोलन केले.

Farmers from 12 districts stage road blockades protesting against land acquisition for the proposed Nagpur-Goa Shaktipeeth Expressway.
Shaktipeeth Highway : कृषी दिनीच शेतकरी रस्त्यावर; शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनी वाचवण्यासाठी 12 जिल्ह्यात चक्काजाम

दरम्यान, याबाबत बोलताना संघर्ष समितीने म्हटले की, शेतकऱ्यांचा मोठा विरोध असतानाही शक्तिपीठ महामार्ग लादला जात आहे. पर्यायी महामार्ग आणि रस्ते असताना राज्याला कर्जबाजारी आणि शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा हा महामार्ग तत्काळ रद्द करावा. राज्य शासनाकडून प्रस्तावित असणारा शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यांतून जात आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या जात असून हजारो शेतकरी भूमिहीन होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com