Mumbai News : अयोध्येत रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 22 जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीस अभिषेक केला जाणार आहे. यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे निमंत्रण ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आतापर्यंत देण्यात आले नव्हते. ठाकरेंना आमंत्रण न दिल्याबद्दल टीका केली जात होती. यामुळे उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.
शनिवारी दुपारी अखेर उद्धव ठाकरेंना राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेचे निमंत्रण देण्यात आले आहे. स्पीड पोस्टने निमंत्रणपत्रिका पाठवून उद्धव ठाकरेंना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र प्रतिष्ठानचे महासचिव चंपतराय यांनी निमंत्रित केले असल्याचे समजते. उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्ष भेटीची वेळ न दिल्याने रामजन्मभूमी न्यासाने निमंत्रण कुरियर केले आहे.
या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबतच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी, तसेच इतर मान्यवरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. आमंत्रण मात्र उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टाने पाठवण्यात आले.
दरम्यान, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला रामायण मालिकेतील अरुण गोविल, दीपिका आणि सुनील लाहिरीदेखील सांस्कृतिक कार्यक्रमाचा भाग बनले आहेत. हा भव्य सोहळा पाहण्यासाठी देश आणि जगाच्या विविध भागांतून लोक अयोध्येत पोहोचणार आहेत. या कार्यक्रमाचे निमंत्रण बॉलिवूड स्टार्सनाही पोहोचले असून त्यांची संपूर्ण यादीही समोर आली आहे.
उद्धव ठाकरे यांना राम जन्मभूमी ट्रस्टच्या वतीने निमंत्रण मिळाल्याची माहिती येत आहे. उद्धव ठाकरेंचा त्याच दिवशी नाशिक दौरा आहे. ते काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यामुळे ते निमंत्रण स्वीकारतात की प्रतिनिधी पाठवतात, हे लवकरच समजेल.
R...