Jitendra Awhad : मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल, नितीन देशमुखांसाठी पोलिसांना भिडले

FIR Filed Against Jitendra Awhad : लिस फक्त आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत तर मारहाण करणाऱ्यांना सोडत आहेत, असा गंभीर आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
 Jitendra Awhad Nitin Deshmuk
Jitendra Awhad Nitin Deshmukhsarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad News : विधानभवन परिसरात झालेल्या हाणामारीनंतर मध्यरात्री पोलिसांनी नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिस फक्त आपल्याच कार्यकर्त्यांवर कारवाई करत आहेत तर मारहाण करणाऱ्यांना सोडत आहेत, असा गंभीर आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या जीपसमोरच ठिय्या आंदोलन केले होते. आव्हाड हे जीपसमोरून हटत नव्हते. पोलिसांनी त्यांनी फरपटत बाजुला नेले.

जितेंद्र आव्हाड यांनी पोलिस ठाण्यात देखील आपल्या कार्यकर्त्यांसह जात पोलिसांशी वाद घातला. या प्रकरणी गंभीर दखल सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हाचा निषेध केला आहे. ते म्हणाले, विधानभवनातील कालची हाणामारीची घटना, काळीमा फासणारी आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी विधानभवनात गुंड आणले गेले. कायदा-सुव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहावे. ही स्थिती खराब झाली आहे.

 Jitendra Awhad Nitin Deshmuk
Kolhapur Politics: 'सोन्याचे गाव' लोकनियुक्त सरपंचाला ग्रामस्थांनी दाखवला घरचा रस्ता..

विधानसभा अध्यक्षांनी शब्द पाळला नाही

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, माझ्या कार्यकर्त्याला घेऊन जात असताना मी आडवले. त्यांच्याकडे वाॅरंट नव्हते. ते म्हटले की आम्हाला आदेश दिला आहे. मी गुन्हा दाखल झाला म्हणून घाबरणारा नाही. आम्ही 40 वर्ष लढत आहोत. मी राजकीय कार्यकर्ता आहे. माझं आयुष्य आंदोलनात गेलंय. दरम्यान, कारवाईबाबत विधानसभाअध्यक्षांनी काल दिलेला शब्द पाळला नाही, असे देखील आव्हाड म्हणाले.

 Jitendra Awhad Nitin Deshmuk
BJP News : …तर भाजप येत्या लोकसभा निवडणुकीत 150 जागाही जिंकणार नाही; पीएम मोदींचे नाव घेत बड्या नेत्याने केला दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com