Narhari Zirwal In Trap : 'नरहरी झिरवळांसाठी माजी मंत्र्यानेच लावला सापळा, तो व्हिडिओ...', काँग्रेस आमदाराचा धक्कादायक दावा

Narhari Zirwal Video Vijay Wadettiwar : मंत्री नरहरी झिरवळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आणण्यामागे माजी मंत्री असल्याचा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Vijay Wadettiwar alleges a political conspiracy in the Narhari Zirwal video controversy.
Vijay Wadettiwar alleges a political conspiracy in the Narhari Zirwal video controversy.sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar News : मंत्री नरहरी झिरवळ यांचा ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यानी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, झिरवळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार, विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, 'झिरवळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठं नाव समोर येत आहे. सरकारमधील एक माजी मंत्री आहे. तोच हे सगळं करतो आहे. जर झिरवळांची जागा खाली झाली तर त्याची एन्ट्री होईल, असा सगळा प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे.'

'जे नको आहेत ते टार्गेट होत आहेत. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसलाय. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढायला तिसरा लाईनमध्ये आहेच. आशामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे.', असे देखील ते म्हणाले.

Vijay Wadettiwar alleges a political conspiracy in the Narhari Zirwal video controversy.
Narhari Zirwal video : नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीतून मिळाला पहिला पाठिंबा : अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून डाव टाकल्याचा दावा

...तर तीन मंत्र्यांची विकेट

'मी कालच म्हटलो होतो की पेनड्राईव्ह समोर आला तर किमान तीन मंत्र्यांच्या विकेट पडतील. व्हिडिओ पुढे आले तर ते पदावर राहू शकणार नाहीत. चाकणकरांनी पाय धुतले तर आपण त्यांना काढून टाकले. पण त्यांच्यापेक्षाही विचित्र क्लिप त्या पेनड्राईव्हमध्ये आहेत. ते केवळ मोबाईल दाखवतायेत, लॅपटाॅप दाखवतायेत. पण ते पेन ड्राईव्ह लपवत आहेत. सोयीचं जेवढं आहे तेवढच काढून कारवाई सुरू आहे.', असा दावा देखील त्यांनी अशोक खरात प्रकरणात केला आहे.

Vijay Wadettiwar alleges a political conspiracy in the Narhari Zirwal video controversy.
Narhari Zirwal Video Viral : व्हायरल व्हिडीओनंतर नरहरी झिरवाळ पुन्हा अडचणीत : हर्षवर्धन सपकाळांकडून राजीनाम्याची मागणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com