Gadchiroli Naxal : टिटोळातील पोलिस पाटलाच्या हत्येप्रकरणी कट्टर जनमिलिशियास अटक

Naxal : सरकारने घोषित केले होते लाखांचे बक्षीस
Gadchiroli Naxal
Gadchiroli NaxalSarkarnama

Police Action : एटापल्ली तालुक्यातील टिटोळा या गावात पोलिस पाटलाची हत्या केल्याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी माओवादी चळवळीत कार्यरत असलेल्या जनमिलिशियास अटक केली. दोन डिसेंबरपासून गडचिरोली मध्ये माओवाद्यांचा स्थापना दिवस सप्ताह सुरू होता. त्यादरम्यान त्यांनी या पोलिस पाटलाची हत्या केली होती.

लालसु वेळदा असे हत्या करण्यात आलेल्या पोलिस पाटलाचे नाव होते. 19 वर्षाच्या कट्टर माओवादी समर्थक जनमिलिशियाने ही हत्या केली होती. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकले आहे. अर्जुन सम्मा हिचामी (रा. झारेवाडा, ता. एटापल्ली, जि.गडचिरोली) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Gadchiroli Naxal
Raju Shetti : जयंतराव, विश्वजीत कदमांचा अहंकार ठेचून काढू

गट्टा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नाल्याजवळ गस्त घालणारा गडचिरोली पोलिसांची माहिती माओवाद्यांना देण्यासाठी अर्जुन हा लक्षात ठेवून होता. अर्जुनच्या माहितीच्या आधारे माओवादी गडचिरोली पोलिसांवर हल्ला करणार होते. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर विशेष अभियान पथकाचे जवान आणि गट्टा पोलिसांनी अभियान राबवून अर्जुनला अटक केली.

अर्जुन अटक केल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने पोलिस पाटलाची हत्या केल्याची कबुली दिली. टिटोळा गावाचे पोलिस पाटील लालसु वेळदा गावातील युवकांच्या रोजगारासाठी झटत होते. मात्र पोलिस पाटील हे खबरे असल्याचा संशय माओवाद्यांना होता. त्यामुळे त्यांनी 23 नोव्हेंबरला लालसु वेळदा यांच्या हत्या केली होती. तेव्हापासून पोलिस मारेकऱ्यांच्या शोधात होते. माओवाद्यांकडून करण्यात आलेल्या हत्येमध्ये अर्जुन याचा प्रत्यक्ष सहभाग होता हे उघड झाले.

गट्टा (जां.), हेडरी आणि सूरजागड भागातील सुरक्षा जवानांच्या हालचालींवर अर्जुन हा बारिक लक्ष ठेवून होता. 2023च्या फेब्रुवारीत व मार्च महिन्याच्या सुरुवातीला विसामुंडी आणि अलेंगा येथील बांधकाम उपकरणांच्या जाळपोळीतही त्याचा सक्रीय सहभाग होता. टिटोळा येथील पोलिस पाटलाच्या हत्येमध्ये अटक करण्यात आलेला तो पहिला आरोपी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जुन सम्मा हिचामी 2021 पासून झारेवाडा आणि आसपासच्या भागात कार्यरत जनमिलीशिया म्हणून सक्रिय होता. काही दिवसात पेरमिली दलममध्ये सदस्य पदावर सहभागी होण्याची त्याची योजना होती. महाराष्ट्र शासनाने अर्जुन सम्मा हिचामी याच्या अटकेवर 1.5 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून माओवादी कारवायांनी पुन्हा जोर धरला आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या तोडगट्टा गावाजवळ लोहखाण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदिवासी नेत्यांनी पोलिसांना घेरलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) हे गडचिरोलीतून परतल्यानंतर माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात हत्या सत्राला सुरुवात केली होती. या प्रकारामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे देखील गडचिरोलीच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र ऐनवेळी अमित शाह यांचा गडचिरोली दौरा रद्द झाला.

(Edited by Sachin Waghmare)

Gadchiroli Naxal
Gadchiroli Naxal : खाणींविरोधातील आंदोलन तीव्र होणार; गुरुवारी माओवाद्यांनी पुकारला बंद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com