Eknath Shinde Ayodhya Visit : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अयोध्येतील राम मंदिराला 'ही' खास भेट

Uday Samant Reply To Sanjay Raut : प्रभू रामचंद्रांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्य सोपवलं आहे.
Eknath Shinde Ayodhya Visit
Eknath Shinde Ayodhya VisitSarkarnama
Published on
Updated on

Ayodhya News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदारांवर अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. शिवसेनेकडून या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्या दौऱ्याची वातावरण निर्मिती करण्यात शिंदे चांगलेच यशस्वी ठरले आहेत. याचवेळी विरोधकांकडून शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र, याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम मंदिराला २ तोळ्यांचा धनुष्यबाण भेट दिला आहे.

एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे शनिवारीच अयोध्या दौऱ्यात दाखल झाले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सकाळी अयोध्येत दाखल झाले. यावेळी शिंदे यांचं अयोध्येत जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यानंतर अयोध्येतील रामसेतू पार्क येथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदयात्रेला सुरूवात झाली. रामसेतू पार्क ते राम मंदिर अशी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Eknath Shinde Ayodhya Visit
Sanjay Raut On Eknath Shinde : संजय राऊतांचा गौप्यस्फोट; म्हणाले,''शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही...''

यानंतर रामजन्मभूमी अयोध्या नगरीतील रामलल्लाच्या मंदिरात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामचंद्राचे मनोभावे दर्शन घेतलं. त्यानंतर मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने प्रभू श्रीरामाची महाआरती संपन्न झाली. यावेळी 'जय श्रीराम'च्या जयघोषानं संपूर्ण मंदिर परिसर निनादून गेला.

यावेळी शिवसेना व भाजप पक्षातील मंत्री, खासदार आमदार यांच्यासह मोठ्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच राम मंदिराच्या बांधकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी राम मंदिराला दोन तोळ्याचा सोन्याचा धनुष्यबाण भेट म्हणून दिला.

रामलल्लाच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस हनुमान गढीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू रामचंद्राची आरती करून दर्शन घेतले. यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कायक्रर्त्यांसह लोकांनी प्रचंड गर्दी केली.

Eknath Shinde Ayodhya Visit
Ashish Deshmukh News : निलंबन कारवाईला देशमुखांचं प्रत्युत्तर; पृथ्वीराज चव्हाणांना लिहिलं पत्र; काय म्हणाले?

राऊतांच्या टीकेला सामतांचं प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार करताना, त्यांनी पाप केलं. आम्ही प्रभू रामचंद्र यांचा आशीर्वाद घ्यायला आलोय. कारण प्रभू रामचंद्रांनीच हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार जपणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्य सोपवलं आहे. त्याच्यामुळे आम्ही भावनिक बाब म्हणून बघतो. ज्यांना कोणाला टीका करायची ते करू द्या.

मागच्या दोन दौऱ्याचा मी स्वतः साक्षीदार आहे, किती लोक कोणाला भेटले? काय दौरा झाला? कशा पद्धतीने दौरा झाला? कोणी कोणाला भेटत नव्हतं. कोण कोणाशी बोलत नव्हतं. ते फक्त राजकीय आम्ही हिंदुत्व पाळत आहेत. महाविकास आघाडीमध्ये असताना हिंदुत्व फक्त दाखवण्यासाठी होतं असा टोला लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंना आम्हीच याआधी अयोध्ये(Ayodhya)ला घेऊन गेलो होतो. अयोध्येत जाणे हा एक आनंद असतो, पण प्रभू श्रीरामाचे सत्यवचन तुम्ही कुठून घेणार? असा सवाल राऊत यांनी केला. तेच हे सगळं ढोंग असून प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद याना अजिबात मिळणार नाही असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com