Manoj Jarange Patil News : मराठा आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा वाजवणार..

Give Maratha reservation, else you will be wiped out in elections, warns Manoj Jarange : तुम्ही आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या निवडणूक मध्ये आमच्या नावाने ओरडु नका. सरकारला आता वेळ वाढवुन देणार नाही, आरक्षण न दिल्यामुळे उमेदवार उभे करायचे का समोरच्यांचे पाडायचे ? हे समाज विचारत आहे.
Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on

दिलीप दखणे

Maratha Reservation News : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी जीवघेणा प्रवास सुरू केला आहे. आमचा अंत पाहू नका, अजूनही वेळ गेलेली नाही. आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा-तेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. अंतरवाली सराटी येथे उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

तुम्ही माझ्याविरोधात कितीही डाव टाका, गणित मांडा पण तुमचे सगळे गणितं मी बिघडवणारच. आरक्षण दिले नाही तर निवडणुकीत माझ्या नावाने ओरडू नका, अशा शब्दात जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दम भरला. माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी माझा जीवघेणा प्रवास सुरू आहे. मला व समाजाला राजकारणात जायच नाही, आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहे. मी राजकीय भाषा बोलणार नाही, दोन- चार दिवसात मागण्याची अंमलबजावणी करावी आणि आरक्षण द्या, असे आवाहन जरांगे यांनी माध्यमाशी बोलताना केले.

तुम्ही आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या निवडणूक मध्ये आमच्या नावाने ओरडु नका. सरकारला आता वेळ वाढवुन देणार नाही, आरक्षण न दिल्यामुळे उमेदवार उभे करायचे का समोरच्यांचे पाडायचे ? हे समाज विचारत आहे. मराठ्यांचे पोरं सोपी नाहीत. 2024 ला तुमचा भुगा करणारच, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil News
Manoj Jarange Patil : जरांगे-पाटील राजकीय वक्तव्य करणार नाहीत; मात्र शिंदे सरकारसमोर ठेवली 'ही' अट

दरम्यान, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. प्राथमिक आरोग्य केंद्र वडीगोद्री चे वैघकिय अधिकारी डॉ.अनिल वाघमारे यांनी जरांगे यांची तपासणी केली. (Maratha Reservation) जरांगे यांच्या मागणी बाबत शासनस्तरावर चर्चा सुरु आहे. या बाबतचे पत्र जिल्हाधिकारी जालना यांच्या मार्फत शासनाकडे पाठवले असल्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी जरांगे यांना सांगितले.

अंतरवालीजवळच ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषण

अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे अंतरवाली सराटी रोडवरील सोनियानगर येथे ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने आजपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कुणबी प्रमाणपत्र वाटप, सगे सोयरे ची अंमलबजावणी, हैदराबाद गॅजेट यामुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येत आहे.

Manoj Jarange Patil News
Maratha Reservation : आरक्षण घेणारच! मध्यरात्रीपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरू

सरकारने असे निर्णय घेऊ नये, मराठा समाजाला वेगळ आरक्षण द्या, ओबीसी आरक्षण अबाधित ठेवा, यासाठी आमचे उपोषण असल्याचे मंगेश ससाने यांनी स्पष्ट केले. पुण्याचे ससाने यांच्यासह बाळासाहेब दखणे, बाबासाहेब बटुळे, शरद राठोड, प्रा. विठ्ठल तळेकर, संतोष वीरकर यांनी ओबीसी आरक्षण बचावसाठी आजपासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, ओबीसीच्या न्याय हक्कासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करण्यासाठी निघालेले ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांना वडीगोद्री-अंतरवाली सराटी रोडवर काल मंगळवार (ता.17) रोजी जालना पोलीस प्रशासनाने रोखले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com