Maratha Reservation : आरक्षण घेणारच! मध्यरात्रीपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरू

Manoj Jarange Patil hunger strike Maratha reservation : राजकारण करू नका म्हणणाऱ्या माकडांना सांगा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, असा टोला देखील मनोज जरांगे पाटील यांनी भाजपला लगावला.
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil News : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणा बसले आहेत. मी राजकारणावर बोलणार नाही मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, असे उपोषणाला बसण्याची आधीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ठणकावले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे दर्शन घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली. मनोज जरांगे पाटील हे आंदोलन सुरू झाल्यापासून सहाव्यांदा उपोषणाला बसले आहेत.

सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, हैद्राबाद गॅझेटसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करावे आदी मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. मागील उपोषणावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मात्र, सरकारच्या वतीने आरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नावर मनोज जरांगे पाटील संतुष्ट नसल्याचे दिसून येते.

Manoj Jarange
Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांचं महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठे विधान; इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली

...तर देवेंद्र फडणवीस जबाबदार

मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील. राजकारण करू नका म्हणणाऱ्या माकडांना सांगा मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी बसलाय, असा टोला देखील मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्यांना लगावला.

सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी सरकारला ही शेवटची संधी असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यामुळे लोकसभेत ज्या प्रकारे फटका बसला तसा फटका विधानसभेत बसू नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्याआधीच देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असे जरांगे म्हणाले होते. यावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकरांनी विचारले असते फडणवीस म्हणाले, तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात, तुम्ही त्यांना विचारले पाहिजे, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बोट दाखवले.

Manoj Jarange
Anandrao Adsul News : माजी खासदार आनंदराव अडसूळ आता करणार दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर दावा?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com