Gopichand Padalkar : 'मनोज जरांगेंनी डाॅक्टर बदलला पाहिजे', गोपीचंद पडळकरांचा टोला

Gopichand Padalkar Manoj Jarange patil : राज्यात धनगड अस्तित्त्वात नाही. जे पाच सहा लोकं होती त्यांना दाखले दिले होते ते दाखले रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.
Gopichand Padalkar On Manoj Jarange
Gopichand Padalkar On Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Gopichand Padalkar News :मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळली आहे.त्यांना तपासण्यासाठी आलेल्या डाॅक्टरला ते फडणवीसांचे ऐकुण माझा गेम करतो का? असे ते म्हणाले. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा डॉक्टर एकच आहे. त्यांनी डॉक्टर बदलला पाहिजे.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. ते दोन नंबरवाल्यांचे संरक्षण करत असल्याचे म्हटले होते. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी विचारले असता ते म्हणाले, त्यांनी काय भाष्य केलं ते बघितलं नाही. बघितल्या शिवाय भाष्य करण योग्य नाही.

Gopichand Padalkar On Manoj Jarange
Mumbai High Court : मुंबई हायकोर्टाचा केंद्र सरकारला दणका; Fack Check यूनिट ठरवले असंविधानिक

धनगर, धनगड एक नाही

सरकारने जीआर काढावा. धनगड आणि धनगर एक नाही. राज्यात धनगड अस्तित्त्वात नाही. जे पाच सहा लोकं होती त्यांना दाखले दिले होते ते दाखले रद्द करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत, असे पडळकर यांनी सांगितले.

राज्यभर आंदोलन

धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देऊ नका म्हणून आदिवासी आमदार आक्रमक झाले आहेत. त्यावरून धनगर नेते देखील आरक्षणासाठी आक्रमक होतील, असा इशारा पडळकर यांनी दिला. तसेच सोमवारी (ता.23) धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचे आवाहन देखील पडळकर यांनी केले आहे.

Gopichand Padalkar On Manoj Jarange
Mahayuti News : मतदारसंघ एकच दावा तीन पक्षांचा; महायुतीत धाराशिव-कळंब कोणाला मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com