पुणे : आझाद मैदानातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून बाहेर पडलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा MPSC विद्यार्थ्यांचा प्रश्न हाती घेतला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मागच्या ४ महिन्यांपासून सरकारने MPSC च्या विविध प्रश्नांबाबत फक्त घोषणाच केली, केवळ तोंडाची वाफ केली अशी टीका केली आहे.
पडळकर म्हणाले, स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण होऊनही स्वप्निल लोणकरसारख्या (Swapnil Lonkar) होतकरु विद्यार्थ्यांला आत्महत्या करावी लागली होती. तेव्हा या प्रस्थापितांच्या आघाडी सरकारने खोटा आव आणत MPSC च्या विविध प्रश्नांबाबात फक्त घोषणाच केल्या. केवळ तोंडाची वाफ केली. विधानसभेत मोठ्या घोषणा करणाऱ्या अजित पवारांनी विद्यार्थ्यांची फक्त दिशाभूल केली. आज ४ महिने उलटून गेल्यानंतरही लोकसेवा आयोगावरील सदस्यांच्या नियुक्त्यांबाबत सरकार उदासीन आहे.
२०१९ साली उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे अजूनही नियुक्तीसाठी झुरावे लागत आहे. कोरोना काळात लांबलेल्या परिक्षांमुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले. त्यावर पाठपुरावा केल्यानंतर सरकारने वयोमर्यादा वाढविण्याची फक्त घोषणाच केली, प्रत्यक्षात मात्र या प्रस्थापितांनी अंमलबजावणी न करता बहुजन विद्यार्थ्यांच्या तोंडाला पानं पुसली.
MPSC ते आरोग्य विभागातील पदभरतीत गोंधळ घालणाऱ्या सरकारची बहुजन विद्यार्थ्यांप्रती नियत साफ नाही. त्यांच्या हेतुवरच आता विद्यार्थी शंका निर्माण करत आहेत. अशा प्रस्थापितांचा मी जाहीर धिक्कार करतो, अशीही टीका पडळकरांनी केली.
एसटी आंदोलनातून पडळकर बाहेर
जवळपास ३ आठवडे आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी २५ नोव्हेंबर रोजी आंदोलनातून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले. समितीचा अहवाल २० डिसेंबरला येणार आहे, २० डिसेंबरलाही निर्णय होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आंदोलनात जेवढे मिळते ते पदरात पाडून घ्यायचे आणि राहिल्यासाठी भांडायचे असते, असे म्हणत पगारवाढ झाल्यानंतर ते आंदोलनातून बाहेर पडले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.