Kunbi Validated : मनोज जरांगे पाटलांनी कंडका पाडला, 'त्या' चार नेत्यांची कुणबी प्रमाणपत्र वैध ठरणार, सरकारने शब्द दिला

Government Manoj Jarange : मराठवाड्यातील चार लोकप्रतिनिधींची मराठा-कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये अवैध ठरली होती. ती वैध ठरवण्याचा शब्द सरकारकडून देण्यात आला आहे.
Kunbi certificates of four Marathwada leaders to be validated
Kunbi certificates of four Marathwada leaders to be validatedsarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी आज आपले उपोषण स्थगित केले. उपोषण स्थगित करत असताना मराठवाड्यातील ज्या चार राजकीय प्रतिनिधींची जात प्रमाणपत्र अवैध ठरली होती. ती वैध केली जातील, असा शब्द सरकारच्या शिष्टमंडळाकडून मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.

जरांगे यांच्या मागणीनुसार तीन महिन्यांत जीआर काढून सातारा, कोल्हापूर, पुणे, औंधचं गॅझेट लागू करण्यात येईल, कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी हैदराबाद गॅझेटनुसार सुधारीत जीआर काढला जाईल, मराठवाडयातील 4 लोकप्रतिनिधींची रद्द केलेली कुणबी प्रमाणपत्रे वैध केली जातील, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रांना वैधता देणं चालूच राहील, शिंदे समितीस मिळालेल्या 58 लाख नोंदी घटवणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे.

माजलगावमधील नगरेसविका रेखा अंबुरे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि बीडमधील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत विजयी झालेल्या तीन विजयी उमेदवारांची जात प्रमाणपत्र अवैध ठरली होती. त्या विरोधात जरांगे पाटील हे आक्रमक झाले होते. आपल्या इतर मागण्यांसोबत ही प्रमाणपत्रे देखील वैध ठरवण्याची त्यांनी मागणी केली होती.

Kunbi certificates of four Marathwada leaders to be validated
Manoj Jarange : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडले, सरकारला 90 दिवसांची मुदत; शिष्टमंडळाकडून यशस्वी मध्यस्थी!

मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून उपोषण करत होते. मात्र, सरकारने योग्य प्रतिसाद न दिल्याने ते 15 सप्टेंबरला मुंबईकडे रवाना झाले होते. मुंबईला रवाना होताना त्यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले होते. दरम्यान, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. पाटोदा येथे मुक्कामादरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु होते.

अखेर सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची सकाळी सहा वाजता भेट घेतली. त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले तसेच सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला.

...तर पुन्हा मुंबईला येणार

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने आता आम्हाला फसवले तर आम्ही मुंबईला येणार. माझ्यासोबत मराठे देखील मुंबईला येतील. आपण उपोषण स्थगित करतोय मात्र आंदोलन सुरू राहणार आहे. पुढील 90 दिवसात सातारा गॅझेट लागू लागू करा, असे ते म्हणाले

Kunbi certificates of four Marathwada leaders to be validated
Bhiwandi Crime : भिवंडीत भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल; दारू पाजून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com