Manoj Jarange Patil News : सरकारने गोड बोलून मान कापली, आता अचानक आंदोलन! मनोज जरांगे पाटील गनिमी कावा वापरणार

Manoj Jaringe Patil issues a stern warning after alleging that the government has cheated and announces an upcoming protest. : आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि ओबीसींच्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे. सरकारने अधिसूचना काढायलाच उशिर लावला. त्यामुळे आमची फसवणूक झाली.
Manoj Jarange Patil-CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange Patil-CM Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्यातील महायुती सरकारने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः लाडकी बहीण योजनेचे अनुदान न वाढवणे, शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जमुक्ती संदर्भात बजेटमध्ये कुठलेच भाष्य नाही. यावरून सरकारवर टीकेची झोड उठत असतानाच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'सरकारने गोड बोलून मान कापली' अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

गोरगरिबांच्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी या विषयांना सरकारने हातच घातला नाही. त्यामळे आता सरकारला वठणीवर आणण्यासाठी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावे लागेल. सांगायचं नाही, बोलायचंही नाही आणि अचानक आंदोलन करायचं, त्याशिवाय हे ताळ्यावर येणार नाहीत, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. बजेटमध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करेल असं सांगितले जात होते. पण सरकारने कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे.

सरकारचं आता भागलं आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी बजेटमध्ये काहीच दिलं नाही. उलट लाडक्या बहिणींना अपात्रतेच्या नावाखाली योजनेतून काढलं जात आहे, अशी टीका मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली. सरकारने शेतकऱ्यांना काहीच दिलं नाही. कर्जमाफी नाही आणि कर्जमुक्तीही नाही. गोरगरिबाच्या आरक्षणाचा प्रश्नही मार्गी काढला नाही. म्हणजे किती गोड बोलून मान कापली जाते. त्यामुळे इथून पुढे सांगायचं कमी, बोलायचं कमी आणि अचानक आंदोलन करायचे.

Manoj Jarange Patil-CM Devendra Fadnavis News
Manoj Jarange News : '..त्यांनी कितीही माणसं मारली तरी आपलाच बाब्या चांगला', जरांगेची टीका

सरकारचं आता भागलं..

विधानसभा निवडणुकी आधी हे किती पाया पडत होते. सरसकट सगळ्या लाडक्या बहीणींना पैसे दिले. निवडून आल्यावर 2100 रुपये देऊ, असे सांगितले. पण ते राहिलं बाजूला उलट नियम अटी लावून लाडक्या बहि‍णींना योजनेतून बाहेर काढण्याचे प्रकार सुरू आहेत. याचा अर्थ त्यांच आता भागलंय. त्यामुळे त्यांना आता फक्त गोड बोलायचं, करायला मात्र चुकायचं नाही. त्यांच्याकडे जसा कावा आहे, तसा गोरगरिबांकडे सुद्धा आहे, असा सूचक इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

Manoj Jarange Patil-CM Devendra Fadnavis News
Maharashtra Budget : शिंदेंच्या नाराजीला फोडणी; फडणवीस-अजितदादांनी शिवसेनेला दिला सर्वात कमी निधी

सरकारने शंभर टक्के आमची फसवणूक केली आहे. त्यावेळी आम्हाला ओबीसी आरक्षणात जायचं होतं आणि ओबीसींच्या कायद्यात दुरुस्ती करायची असेल तर त्याची अधिसूचना सरकारने काढली पाहिजे. सरकारने अधिसूचना काढायलाच उशिर लावला. त्यामुळे आमची फसवणूक झाली असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. पण आता डाव कसे टाकायचे हे आम्हाला चांगलं माहीत आहे. अशी तयारी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी नव्या आंदोलनाचे संकेत दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com