Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या गणेशविसर्जन मिरवणुकीकडे जिल्ह्यातील मंत्र्यांची पाठ! गिरीश महाजन मात्र चमकले!

Political News Nashik: नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी जिल्ह्यातील चार मंत्री इच्छुक आहेत. मात्र, या मंत्र्यांना नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचा विसर पडला असल्याची टीका करण्यात येत आहे.
Nashik Ganesh Visarjan
Nashik Ganesh Visarjansarkarnama
Published on
Updated on

Prathmesh Gite News: नाशिकचा पालकमंत्री कोण या विषयावर नाशिक जिल्ह्यातील चारही मंत्र्यांच्या मनामध्ये हुरहुर निर्माण होते. चारही मंत्री पालकमंत्रिपद मिळावे यासाठी धडपड करत आहेत. मात्र गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचे श्रेय गिरीश महाजन घेऊन गेले.

या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने जिल्ह्यातील चारही मंत्र्यांवर टीकेची झोड उठविली. जिल्ह्याला चार मंत्री असताना समाजाचा आणि शहराचा उत्सव असलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीकडे कोणीही फिरकले नाही. हे चार मंत्री होते तरी कुठे असा प्रश्न शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश गीते यांनी केला आहे.

नाशिकच्या गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून पूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने विरोध केल्याने त्याला स्थगिती देण्यात आली.

एकनाथ शिंदे पक्षाचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे जिल्ह्याचे प्रमुख मंत्री आहेत. पालकमंत्री होण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. अद्यापही ते पालकमंत्रिपदाचे स्वप्न पाहत आहेत. मात्र, नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला ते कुठे होते असा प्रश्न नाशिकचे गणेश भक्त करीत आहेत.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ असे अन्य तीन मंत्री आहेत. नाशिक शहराचा गणेशोत्सव हा नाशिक जिल्ह्याचा प्रतिनिधिक उत्सव मानला जातो. नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठी परंपरा आहे. शहराचे प्रथम नागरिक आणि मंत्री मिरवणुकीला प्रारंभ करताना आवर्जून उपस्थित राहतात.

Nashik Ganesh Visarjan
Karnataka Politics : लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका, कर्नाटकात जातीनिहाय जनगणनेआधीच खळबळ! भाजपच्या मतपेढीवर परिणाम?

नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीला यंदा मात्र ही परंपरा मोडली गेली, अशी भावना नाशिक शहरातील राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे प्रथमेश गीते यांनी सांगितले. गिरीश महाजन हे जळगावचे मंत्री असताना त्यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीला कोणाचाही आक्षेप नाही. त्यांनी आवर्जून नाशिकला हजेरी लावावी. मात्र नाशिकला चार मंत्री असताना गिरीश महाजन गणेश विसर्जन मिरवणुकीला उपस्थित राहतात, यातून कोणता राजकीय संदेश जातो, असा प्रश्न प्रथमेश गीते यांनी केला.

नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री अद्याप जाहीर झालेला नाही. पालकमंत्री होण्यासाठी जिल्ह्यातील चारही मंत्र्यांची इच्छा लपून राहिलेली नाही. सुरुवातीला दादा भुसे, त्यानंतर माणिकराव कोकाटे आणि सध्या ज्येष्ठ मंत्र्यांनीही ही भावना जाहीरपणे व्यक्त केली आहे. चार मंत्री असूनही आणि प्रत्येकाला पालकमंत्री पदाचे स्वप्न पडत असताना शहराच्या सांस्कृतिक आणि प्रतिनिधिक उत्सवाला मात्र यातील एकही फिरकला नाही, ही खंत प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे गीते म्हणाले.

Nashik Ganesh Visarjan
OBC Vs Maratha: मराठा आरक्षणानंतर ओबीसी संघटना एकवटल्या; दोन स्तरावर लढणार लढाई, प्लॅन तयार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com