
Mumbai News : राज्यभरात होळीचा सण साजरा केला जात आहे. धुळवडीच्या निमित्ताने आज एकमेकांच्या अंगावर रंग उधळत नेतेमंडळी या सणाच्या उत्साहात आनंदाने सहभागी झाले आहेत. त्यातच शुक्रवारी ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. टोलच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी ठाकरे यांची खिल्ली उडवली. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून मजा करा पण घाणेरडं राजकारण करू नका अशा शब्दांत मनसेच्या नेत्याने सदावर्तेना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
टोलच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची खिल्ली उडवली. ‘राज ठाकरेंवर काय बोलायचं? तर मी एक म्हणेल राज ठाकरे तुम्ही एक करा, टोल -टोल टनटनाटन, अरे टोल के उपर गिनो भाई, अरे टोल के उपर गिनो, लेकीन राज समज लेना इस राज के अंदर कभी भी भाषा के उपर अपनी राजनिती की रोटी न शेकना’ असे म्हणत सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली
दरम्यान, त्यानंतर सदावर्ते यांच्या या टीकेला मनसेकडून (MNS) देखील जशास तसं उत्तर देण्यात आले. मनसे नेते अमेय खोपकर यांनी जोरदार पलटवार केला. ‘कोण गुणरत्न सदावर्ते ते कर्जतवरून बोलतायेत की कसाऱ्यातून बोलत आहेत? त्यांच्या मागे बुजगावनं उभं असतं, बुगुबुगु करत एक प्राणी उभा असतो. ही यांची पात्रता, आणि हे आमच्यावर टीका करणार आमच्या परिवारावर टीका करणार यांची लायकी काय? महाराष्ट्रासाठी यांनी काय केलंय असा सवाल उपस्थिक्त करीत मनसे नेते खोपकर यांनी टीका केली.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांनी देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे हे भांग पिऊन बोलतात असं त्यांनी म्हटलं होतं. त्याला देखील खोपकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कृपाशंकर यांची राज ठाकरेंवर टीका करण्याची लायकी नाही, असे म्हणत खोपकर यांनी कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या टीकेचा विषयच संपवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.