कृष्णकांत कोबल
Nana Bangre News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुती तसेच महाविकास आघाडी अशा दोन्हीही गोटात उमेदवारांची चाचपणी सुर आहे. त्यातच अनेक इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार, असा विश्वास व्यक्त करीत तयारी सुरू केली आहे. वडगाव शेरी मतदारसंघात तुमच्या सेवकाला संधी द्या, असे पत्र माजी आमदार जगदीश मुळीक असे लिहले आहे.
हडपसर मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघावर राष्ट्रवादीकडून हक्क सांगितला जात असतानाच शिवसेनेचे शहर प्रमुख प्रमोद (नाना) भानगिरे यांचे एक भावनिक पत्रक व्हायरल झाले असून त्यांनी देखील उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.
तुमच्या या नानाला मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे, असे भावनिक आवाहन पत्रात करण्यात आले आहे. प्रमोद भानगिरे यांच्या उमेदवारीच्या दाव्यामुळे हडपसर मध्ये मतदारसंघात वेगळे ट्विस्ट निर्माण झाले आहे.
महायुतीतील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची विधान परिषदेवर वर्णी लागल्याने सुखावलेल्या अजित पवार गटाचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा होती. मात्र,भानगिरे यांच्या या पत्राने खळबळ अजित पवार गटात देखील खळबळ उडाल्याचा दावा करण्यात येतो आहे. भानगिरेंच्या दाव्यात महायुतीमध्ये हडपसरच्या जागेसाठी रस्सीखेंच होणार हे निश्चित मानले जात आहे.
भानगिरे यांनी या पत्रात म्हटले आहे की, आपल्या प्रेमरूपी आशीर्वादाने गेली २० वर्षापासून मी समाजकारण व राजकारणात सक्रियपणे कार्यरत आहे. आत्तापर्यत केलेल्या विविध विकास कामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचताना मनात समाधानाची व कृतज्ञतेची भावना आहे. कोणतीही राजकीय पाश्वभूमी नसताना फक्त आणि फक्त आपल्या प्रेमामुळे व कुटुंबातील समाजकारणाच्या शिकवणीमुळे मी मतदारसंघात राजकारण व समाजकारणाचा पिंड जोपासू शकलो.
हडपसर विधानसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 300 कोटींची विकास कामे आणली. मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान, विरंगुळा केंद्र, भाजी मंडई, नागरिकांना मोफत सेवा देणाऱ्या दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालयाची निर्मिती करून विकासाचे नवे केंद्र हडपसर मध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेचा शहर प्रमुख या नात्याने शहरातील नागरिकांना राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून दिला. जनता दरबारच्या माध्यमातून सातत्याने नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
मतदारसंघात गाजलेली मुख्यमंत्री बैलगाडा शर्यत, राज्यस्तरीय सेनाकेसरी स्पर्धा, भारतातील सर्वात पहिले प्रभू श्रीरामांचे पूर्णकृती शिल्प उभारत सर्व सार्वजनिक उत्सवा बरोबरच पुणे शहरातील सर्वात मोठी धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी गेली अनेक वर्ष आयोजित करीत आलो आहे. मतदारसंघात विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करीत आलो आहे. लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत आहेत हडपसर पूर्णत्वाने बदलायला हवे, या ध्येयाने झपाटून काम करीत आहे. आजही मतदार संघातील प्रत्येक विकास कामासाठी आग्रही आहे. हडपसर मधील असंख्य सोसायट्यांचा चेहरा मोहरा मला बदलायचा आहे. तुमच्या या नानाला मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक जोमाने काम करण्यासाठी आपल्या आशीर्वादाची गरज आहे.'
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.