Haribhau Bagade : हरिभाऊ बागडे चालले राजस्थानला; आमदारकीचा राजीनामा दिला

Haribhau Bagade Resigned from MLA : भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
Haribhau Bagade
Haribhau Bagade Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी विधानसभा अध्यक्ष, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती झाली. राजस्थानच्या राज्यपाल पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या सुपूर्द केला आहे.

राज्यपालपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्वतः फोन करून राज्याबाहेर जावे लागेल, असे हरिभाऊ बागडे यांनी सांगितले होते. विधानसभा अध्यक्ष पदानंतर हरिभाऊ बाकडे यांना थेट राज्यपाल पदी संधी मिळणे हे त्यांचे प्रमोशन असल्याचे बोलले जाते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरिभाऊ बागडे यांना राज्यपाल पदावर संधी देऊन महाराष्ट्राचा सन्मान केल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Haribhau Bagade
Chandrakant Patil On Ajit Pawar : अजितदादा एकटे नाहीत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो; चंद्रकांत पाटील स्पष्ट म्हणाले...

हरिभाऊ बागडे यांचा जनसंघ ते भाजपपर्यंतचा (BJP) प्रवासाची नेहमीच चर्चा होते. हरिभाऊ बागडे यांनी विधानसभा 2024 लढण्याची तयारी केली होती. तसे त्यांना उमेदवारी नाकारण्याची हिंमत देखील भाजप नेत्यांमध्ये नव्हती.

आता त्यांची राज्यपाल पदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या पश्चात इच्छुकांची संख्या वाढली आहे. हरिभाऊ बागडे भाजपच्या महाराष्ट्रात ज्येष्ठ नेते आहे. त्यांचे सेवानिवृत्तीचे वय झाले होते. तसेच भाजपमध्ये विशिष्ट वयापर्यंत निवडणूक लढण्याची अट आहे. त्यामुळे पक्षाने त्यांना पक्षाने प्रमोशन देत निवृत्त केल्याचे म्हटले जात आहे.

Haribhau Bagade
Shivsena Leader Ambadas Danve : बागडे नाना साधा, सरळ माणूस ; राज्यपाल पदाला निपक्षपणे न्याय देतील..

हरिभाऊ बागडे यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते भाजपमधील 40 वर्षे राजकारणात सक्रिय आहे. आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि आता राज्यपाल पदी नियुक्ती, असा त्यांचा प्रवास राहिला आहे. हरिभाऊ बागडे यांनी राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आलेल्या फोनविषयी कमालीची गुप्तता बाळगली होती.

माध्यमांवर थेट नियुक्तीच्या बातम्या आल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. देशातील राज्यपालांच्या कामाविषयी विरोधकांमध्ये नाराजी आहे. हरिभाऊ बागडे यांनी राज्यात काम करताना सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध ठेवून होते. आता राज्यपाल पदावर देखील तसेच काम करतील, अशी अपेक्षा राज्यातील विरोधकांनी व्यक्त केली.

राज्यपाल पदावर नियुक्ती मिळाल्याने हरिभाऊ बागडे यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. हा राजीनामा देऊन हरिभाऊ बागडे राज्यस्थानला चालले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या राज्यपाल पदासाठी शुभेच्छा दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com