Chandrakant Patil On Ajit Pawar : अजितदादा एकटे नाहीत, आम्ही गुण्यागोविंदाने राहतो; चंद्रकांत पाटील स्पष्ट म्हणाले...

Chandrakant Patil said that Ajit Pawar is not alone in the grand alliance : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूर माध्यमांशी बोलताना महायुतीत अजित पवार एकटे नसल्याचे सांगितले. आम्ही महायुतीत गुण्यागोविंदाने नांदतो आहोत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
Chandrakant Patil On Ajit Pawar
Chandrakant Patil On Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षाचे आहे. अजित पवार यांच्या पक्षासह आम्ही गुण्यागोविंदाने राहतो. अजित पवार यांना महायुतीत एकटं पाडलं जातं हे खर नाही. अजितदादा हे विविध कामानिमित्त अमित शाह यांना भेटले असतील. उलट वारंवार भेटल्यामुळे त्यांच्या मनात जे प्रश्न असतील ते सगळे सुटले असतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवरून विचारलेल्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्याची तिजोरीवरून बोलताना, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाराष्ट्राच्या तिजोरीत कोणताही खडखडात नाही. महाराष्ट्राच्या जीएसटीचं आणि स्टॅम्पचे उत्पन्न वाढला आहे. महाराष्ट्राचे एक्साईज उत्पन्न वाढला आहे. महाराष्ट्रात कुठल्याही आर्थिक प्रश्न नाही, आम्ही सगळ्या योजना राबवू. लोकशाहीमध्ये कुणावर कुणालाही आरोप करता येतो. अनिल देशमुख यांनी दोन वर्षांनी हा मुद्दा का काढला? हे कळले नाही. महाराष्ट्रातील जनता यावर विश्वास ठेवणार नाहीत, असेही पाटील म्हणाले.

Chandrakant Patil On Ajit Pawar
Kolhapur flood Situation : कोल्हापूरात पूर परिस्थितीत अन् विधानसभेच्या इच्छुक मदतकार्यासाठी चढाओढ!

जरांगेंनी मुद्द्यांना धरून बोलावे

मनोज जरांगे माझी विनंती आहे की त्यांनी मुद्द्यांना धरून बोलले पाहिजे. वारंवार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर बोलण्यातून तुमच्याबद्दलच निगेटिव्ह मत तयार होत आहे. त्यामुळे मुद्द्याला धरून जरांगे यांनी बोलावं ही माझी त्यांना विनंती आहे. रक्तसंबंधामध्ये व्हेरिफिकेशन नाही हा कायदा 2017 साली देवेंद्र फडणवीस आणि आम्ही आणला होता. या कायद्यात आणि सगेसोयरे यामध्ये काहीही बदल नसल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil On Ajit Pawar
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : फडणवीस - देशमुखांच्या वादात ट्विस्ट; समित कदमांचा मोठा खुलासा...

तर आरक्षण टिकणार नाही

मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात बोलताना, सरसकट आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही. कायद्याने झालेल्या प्रत्येक आरक्षणाला सर्व्हे हा करावाच लागतो. ते काम मागासवर्ग आयोगाचे आहे. त्यांनी आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेला वर्ग मोठा आहे. 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार. पण हा मुद्दा कास्ट बेस नाही, तर क्लास बेस असल्याचं कोर्टात महाविकास आघाडीला मांडता आलं नाही. ते आम्ही कोर्टात मांडलं. त्यानुसार 10 टक्के आरक्षण देण्यात आले. गायकवाड आयोगाचा अहवाल महाविकास आघाडीने मराठीचा इंग्लिशमध्ये करून दिला नसल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजपची तयारी पूर्ण

आगामी विधानसभा निवडणूकीवरून बोलताना, भाजपची 288 जागांवर लढण्याची तयारीत आहे, पण महायुतीत लढण्याचा ठाम निर्णय आहे. महायुतीत जेवढ्या जागा मिळतील त्या लढवू. पण तयारी 288 जागां लढण्याची भाजपने ठेवली आहे. उरलेल्या जागांची तयारी सहयोगी पक्षांसाठी वापर, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com