Harshvardhan Patil: वाजत गाजत 'तुतारी' हाती, पवारांकडून शब्द; तरी हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी 'डेंजरझोन'मध्येच; 'हे' आहे कारण

Indapur Assembly Election 2024 News : शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत पुन्हा एकदा विधिमंडळात जाण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा खटाटोप आहे. मात्र, त्यांच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर व्हायला तयार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.
Harshavardhan Patil
Harshavardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024 Politics: आगामी विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमुळे महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी खटके उडण्यास सुरुवात झाली आहे.त्यामुळे आपलं राजकीय भवितव्य ओळखून इच्छुकांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता थेट संधीच्या शोधात पक्षांतराची मोहीम हाती घेतली आहे.यातच इंदापूरमध्येही यंदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कारण हर्षवर्धन पाटलांनी (Harshvardhan Patil) महायुतीतील भाजपची साथ सोडत थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर खुद्द शरद पवारांनीच पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. अशातच महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारानेच हर्षवर्धन पाटलांना इंदापूरमधून उमेदवारी देण्यात येऊ नये अशी मागणी केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वीच भाजपामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अगदी वाजत गाजत आणि उमेदवारी मिळणारच या कॉन्फिडन्सने दाखल झालेल्या हर्षवर्धन पाटलांना अडचणीत आणखी वाढल्या आहेत. याआधीच शरद पवार (Sharad Pawar) गटातील आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघातील उमेदवारीला कडाडून विरोध दर्शवला आहे.

त्यातच आता काँग्रेस आमदारानंही हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे शरद पवारांसह आणि पाटलांसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेभरणे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Harshavardhan Patil
latest breaking news : राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला काँग्रेसची ऑफर ; उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी उद्या दिला जाणार डिस्चार्ज... - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

आता पुरंदर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्यासह इंदापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे.

जगताप म्हणाले, इंदापूर काँग्रेस भवनचा ताबा हर्षवर्धन पाटील यांच्याकडे आहे. जोपर्यंत इंदापूर पक्ष कार्यालय पुन्हा एकदा काँग्रेसला परत मिळत नाही. तोपर्यंत पाटील यांना उमेदवारी देऊ नये,आम्ही त्यांचं काम करणार नाही, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे. इंदापूर काँग्रेसची इमारत परत करा, त्यानंतरच आम्ही त्यांचं काम करू असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.

माजी मंत्री आणि राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूरमधून उमेदवारीचा शब्दही देण्यात आल्याची माहिती आहे.

शरद पवार यांच्या तुतारीकडून विधानसभा निवडणूक लढवत पुन्हा एकदा विधिमंडळात जाण्याचा हर्षवर्धन पाटील यांचा खटाटोप आहे. मात्र, त्यांच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर व्हायला तयार नाहीत, असे सध्याचे चित्र आहे.

Harshavardhan Patil
Madhuri Misal : 'पर्वती मतदारसंघातून मीच लढणार', उमेदवारीवर माधुरी मिसाळ ठाम

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील तीन प्रमुख नेत्यांनी पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला विरोध करत बंडाचे निशाण फडकवले आहे.हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि इंदापूरचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी परिवर्तन मेळावा घेत अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश करूनही हर्षवर्धन पाटील यांची आमदारकीची स्वप्नपूर्ती होणार का, अशी चर्चा या तीन नेत्यांच्या बंडामुळे होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com