Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला!

Mahayuti Oath Ceremony : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा धडाक्यात पार पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
devendra Fadanvis Mahayuti Oath Ceremony
devendra Fadanvis Mahayuti Oath Ceremony Sarkarnama
Published on
Updated on

बदल्याचं राजकारण करणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस

बदल्याचं राजकारण करणार नाही, बदल दिसेल असं राजकारण करु. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांचा आवाज दाबणार नाही. स्थिर सरकार आम्ही देऊ. असं देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्या पत्रकारपरिषदेतून सांगितले.

शपथविधी सोहळ्यासाठी  आझाद मैदानात बॉलिवूड दाखल

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील जवळपास सर्वच सेलिब्रेटी आझाद मैदाना दाखल झाले आहेत. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, माधुरी दिक्षीत, संजय दत्त आदी दिग्गज कलावंत आलेले आहेत.

पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल

महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते आझाद मैदानात पोहचणार आहेत. तत्पुर्वी सर्वच केंद्रीय मंत्री अन् प्रमुख पाहुणे मैदानात दाखल झाले आहेत.

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचा दालनात सजावट सुरू

मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांचा दालनात सजावट सुरू. देवेंद्र फडणवीस हे थोड्याच वेळात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेच पदभार स्विकारणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दालनात येतील, त्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट करण्यात आली आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : देवेंद्र फडणवीसांनी घेतलं सिद्धिविनायकाचं दर्शन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुंबा देवीचे दर्शन घेतलं आणि गोमातेचे पूजन केलं. सागर बंगल्यावर पूजनासाठी शिरूर आणि उल्हासनगर या ठिकाणाहून दोन गोमाता आणल्या होत्या. यावेळी फडणवीस यांनी या दोन्ही गोमातेचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

DCM Ajit Pawar Oath Ceremony Live : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी गुलाबी टी शर्ट

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी खास टी शर्ट वाटण्यात आले आहेत. शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी गुलाबी रंगाचा टी शर्ट या शर्टवर अजित पवारांच्या फोटोसह एकच वादा अजितदादा असं लिहिलेलं आहे.

Devendra Fadnavis Live News :  देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. मात्र, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दोघेही आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेच हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने सोहळ्याला उपस्थित राहता येणार नसल्याचं पवारांनी सांगितल्याची माहिती आहे.

Amit Shah In Mumbai : अमित शाह आज दुपारी मुंबईत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दुपारी 3.30 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पोहचणार आहेत. त्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते शाह यांची भेट घेणार आहेत. तर शपथविधी सोहळ्यापूर्वी अमित शहा भाजप नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde Live News : ...तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नाहीत

महसूल खाते शिवसेनेला दिलं तर एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र, ते न मिळाल्यास शिवसेनेचा दुसरा नेता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये दादा भुसे यांचे नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास आणि गृह खातं देण्यास भाजपने नकार दिल्यानंतर आता शिवसेना महसुल विभागसाठी आग्रही आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : शपथविधी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल, मोठा फौजफाटा तैणात

शपथविधी सोहळ्यासाठी 5 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 15 पोलिस उपायुक्त आणि 29 सहायक पोलिस आयुक्त तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय 520 पोलीस अधिकारी आणि साडेतीन हजार कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत.

शपथविधी सोहळ्या दरम्यान वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एक अतिरिक्त पोलिस आयुक्त, तीन पोलिस उपायुक्त, 30 पोलिस अधिकारी आणि 250 इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

दरम्यान आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. तो पुढीलप्रमाणे -

छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही वाहिन्या बंद ठेवण्यात येणार आहेत. तेथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग जंक्शनवरून उजवे वळण - डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज - जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Mahayuti CM Oath Ceremony : महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीचं शपथ घेणार

महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीचं शपथ घेणार असल्याच्या साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. हा शपथविधी सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तर इतर मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख महायुतीकडून लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Mahayuti CM Oath Ceremony : महायुतीच्या शपथविधीचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही निमंत्रण

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि जेष्ठ नेते शरद पवार यांना राजशिष्टाचारनूसार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच मनसेप्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Maharashtra CM Oath Ceremony Live updates : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला साधू महंतांची हजेरी

मुंबईच्या आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या अनेक साधू संतांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

Devendra Fadnavis Live updates : फडणवीसांच्या शपथविधीआधीच वर्षा निवास्थानी बॅनरबाजी

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीआधीच मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्याच्या परिसरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरमध्ये फडणवीसांचा 'धर्मरक्षक' आणि 'महाराष्ट्रसेवक' असा उल्लेख करण्यात आला आहे. हे बॅनर आचार्य श्री नवपद्मसागर सूरीश्वरजी आणि साध्वी मयणाश्रीजी महाराज यांच्या वतीने लावण्यात आले आहेत.

Mahayuti Oath Ceremony Live updates : PM मोदींसह भाजपचे अनेक दिग्गज नेते शपथविधीसाठी हजेरी लावणार

महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील आणि विविध राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. PM मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यासह इतर वरिष्ठ नेते आज मुंबईत शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

CM Devendra Fadnavis 3.0 : शपथविधी सोहळ्याला लाडक्या बहिणी उपस्थित राहणार

आज संध्याकाळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. महत्वाचं म्हणजे महायुती सरकारच्या या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना देखील निमंत्रित केलं आहे.

Maharashtra Govt Formation: शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण

Summary

CM of Maharashtra : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. 23 नोव्हेंबरला लागलेला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांसाठी धक्कादायक असाच आहे. या निवडणुकीत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केले आहे. तर महाविकास आघाडीने 46 जागांवर विजय मिळवला. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 8 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे 15 व्या विधानसभेमध्ये महायुतीची सत्ता येणार आहे. राज्यातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदाराची बैठक बुधवारी सकाळी पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेता म्हणून एकमताने निवड झाली. त्यानंतर लगेचच बुधवारी दुपारी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महायुतीच्या नेत्यांनी भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला.

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता आझाद मैदानावर होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या शपथविधी सोहळ्याकडे लागले आहे. शपथविधी सोहळ्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com