
गृहमंत्रालयाने आज देशात होणाऱ्या जनगणनेसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. 2027 मध्ये ही जनगणना होणार असून ती दोन टप्प्यात केली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली आहे.
अधिसूचनेनुसार, पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होणार आहे. त्यात हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख ही ४ डोंगराळ राज्ये समाविष्ट आहेत.
दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. यामध्ये देशातील उर्वरित राज्यांमध्ये जनगणना सुरू होईल.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पायलट सुमित सभरवाल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुंबईतील घरी आणि सोसायटीमध्ये सध्या दुःखाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार DNA टेस्ट चा अहवाल आल्यानंतर सुमित सभरवाल यांचे पार्थिव त्यांच्या घरी आणले जाईल. त्यानंतर पवई येथे त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला झालेला अपघात ताजा असतानाच, एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला हाँगकाँग एअरपोर्टवर तातडीची लँडिंग करावी लागली आहे. AI 315 ही फ्लाइट हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने निघाली होती. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच वैमानिकाच्या लक्षात तांत्रिक अडचण आली. संबंधित विमान हे बोइंग 787-8 ड्रीमलायनर होते. तांत्रिक बिघाड लक्षात येताच वैमानिकाने तात्काळ निर्णय घेत, विमान हाँगकाँगकडे वळवलं आणि सुरक्षितरित्या आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.
गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासाठी राजकोटमध्ये सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राजकोट महानगरपालिकेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या विजय रुपाणी यांचे पार्थिव आज सकाळी ११ वाजता गांधीनगर येथून रवाना होईल. त्यानंतर त्यांचे पार्थिव राजकोटला पोहोचेल. त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना अंतिम दर्शनाची संधी दिली जाईल. सायंकाळी सुमारे ६ वाजता त्यांना रामनाथ पारा स्मशानभूमीत अंतिम श्रद्धांजली देण्यात येईल. या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील तसेच गुजरात सरकारमधील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृतदेहाची काल ओळख पटली असून त्याचा मृतदेह आज
नातेवाईकांना सुपूर्द करणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हजर राहणार आहेत. थोड्याच वेळात विजय रूपानी यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द केला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.