
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी बबनराव लोणीकर यांना ही भाषा बरी नव्हे, असे सांगत तुमची आमदारकी या जनतेमुळेच असल्याचे सुनावले. जनतेच्या अंगावरील कपडे, बूट याचा उल्लेख करताना लोणीकर यांनी आपल्या अंगावरील कपडे, बूट एवढेच नाही तर गाडीमधील डिझेलही या जनतेमुळेच आहे याचे भान राखायला हवे, असा टोलाही लगावला.
मागील काही दिवसांपासून नाराज असलेले भास्कर जाधव आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. राजकारणातून निवृत्त होण्याची संकेत दिले होते. मात्र नंतर त्यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले. त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना आहे.
संताजी घोरपडे साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी मंत्री मुश्रीफांना क्लीन चीट देण्यात आला आहे. घोरपडे कारखान्यात कथित 40 कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक मुश्रीफ यांनी केल्याचा आरोप होता. त्याप्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा. आता पोलिसांनी सी-समरी अहवाल अर्थात क्लोजर रिपोर्ट दाखल केल्याची पोलिसांकडून माहिती दिली आहे. उच्च न्यायालायाने देखील मंत्री मुश्रीफ यांनी गुन्हा रद्द करण्याची याचिका निकाली काढली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढली.
महसूल मंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुणे जिल्ह्यात खाणीची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. लीडर सारख्या अद्यावत ड्रोन द्वारे मोजणी होणार. जिल्ह्यातील मुरूम दगड वाळू उपसा करणाऱ्या खाण्याची मोजणी याड्रोन करण्यात येणार आहे.
अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादाच्या रागातून आठवतीली विद्यार्थ्याने त्याच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्याचा खून केला आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या एका विद्यालयातील ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवीतील विद्यार्थ्याने चाकूने हल्ला केला. त्यामध्ये दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.