Maharashtra Politics : बच्चू कडूंना मनोज जरांगेचा पाठींबा

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama
Published on
Updated on

बच्चू कडूंना मनोज जरांगेचा पाठींबा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसह 17 मागण्याकरत उपोषण करणाऱ्या बच्चू कडू यांना मनोज जरांगे पाटील यांनी पाठींबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांची भेट देखील घेणार असल्याची माहिती आहे. कडू यांचे अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीमधील तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाचा चौथ्या दिवस आहे.

नारायण राणे धाराशिवच्या दौऱ्यावर

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे धाराशिव दौऱ्यावर आज येणार आहेत. तुळजा भवानी मंदिरात जाऊन ते दर्शन घेतील. मागील दोन दिवसांपासून त्यांचे मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यासोबत वाकयुद्ध सुरू आहे. त्यामुळे प्रकाश महाजनांना ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

ऑपरेशन सिंदूरनंतर दहशवादाच्याविरोधात भारताची भूमिका जगाला सांगण्यासाठी परदेशी शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुळे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या भेटीत यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावरील पुस्तके सुळे यांनी पंतप्रधान यांना भेट दिली. तसेच दौऱ्यासाठी त्यांची निवड केल्याने भारत सरकार, प्रधानमंत्री महोदय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि संसदीय कार्यमंत्री किरेनजी रिजेजू यांचे आभार व्यक्त केले.

मराठा आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून सुनावणी

एसबीसीअंतर्गत मराठा समाजाला 10 टक्के आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून मुंबई हायकोर्टा सुनावणी होणार आहे. विशेष खंडपीठासमोर सायंकाळी पाच वाजता सुनावणी सुरु होईल. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्याचा आक्षेप याचिकांमधून घेतला आहे. दरम्यान, सरकारने दिलेले मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण हे सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात दिले गेले आहे.

देवेंद्र फडणवीस माझे बाप नाही, ठाण्यात बॅनरबाजी

मंत्री नितेश राणे यांनी महायुतीचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी राणेंच्या वक्तव्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता.आता ठाणे शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ भलामोठा बॅनर लावला. या बॅनरमध्ये'मी तुषार दिलीप रसाळ... दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत.' असे लिहिले आहे. तसेच मराठी वाघांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावे, असे देखील बॅनवर लिहिलेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com