Maharashtra Political Live Updates : जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री, जावून बसले VIP कक्षात

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Eknath Khadse, Devendra Fadnavis
Eknath Khadse, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : जळगावात फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसेंची एन्ट्री

देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर असताना, भाजपमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त करणारे एकनाथ खडसे हे त्यांची भेट घेतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे फडणवीस-खडसे भेटीत त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या उपस्थितीत जळगावात आयोजित कार्यक्रमात एकनाथ खडसेही पोहोचले, मात्र त्यांनी व्यासपीठावर न जाता थेट व्हीआयपी कक्षात बसल्याचे पाहायला मिळाले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची भेट झाली नाही.

Padalkar on Uddhav Thackeray : 'मुलाच्या पोटी केरसुनी'उद्धव ठाकरेंवर टिका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली 

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संपूर्ण देश बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे हिंदुत्ववादी नेता म्हणून पाहतो. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटाला उद्धव ठाकरेंसारखा मुलगा जन्माला यावा ही दुर्देवी बाब आहे. आमच्याकडे एक म्हण आहे, मुलाच्या पोटी केरसुनी जन्माला येते असे वादग्रस्त शब्द वापरत पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

गावाकडे आजी आमची म्हणायची, कोणी वारलं तर ते आपल्याकडे स्वर्गातून बघत असतात, त्याचप्रमाणे बाळासाहेब हे बघत असावेत, त्यांना किती वेदना होत असतील. आज देशात हिंदुत्वाचे वातावरण तयार झाले आणि त्यातच उद्धव ठाकरे यांनी असं बोलणं हे दुर्देवाची बाब आहे. उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. त्यांनी मताच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणे बंद करावे अशी टीका पडळकर यांनी केली.

Eknath Khadse meets Fadnavis : फडणवीस-खडसे भेटीकडे लक्ष 

एकनाथ खडसे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन कट्टर विरोधकांची आज भेट होण्याची शक्यता आहे. खडसे यांनी या भेटीबाबत माहिती दिली. धरणगावमध्ये क्रांतिवीर खाजा नाईक स्मारक अनावरण प्रसंगी ही भेट होण्याची शक्यता आहे. खडसे यांनी स्पष्ट केले की यात कोणतीही राजकीय चर्चा नसेल, केवळ औपचारिक भेट असेल. जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मंत्री या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या जळगाव दौऱ्यात खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.

DHULE NEWS  : धुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी कृषीमंत्र्यांजवळ मांडल्या विधायक सूचना

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी संघाची मुंबईत बैठक झाली. धुळे जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त शेतकर्‍यांनी विविध विधायक प्रश्न मांडलेत. धुळ्यातील व संघाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील यांनी तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय कृषी समित्यांवर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना प्रतिनिधित्व द्यावे. शेतकऱ्यांना विमा कंपनी योग्य कारण असतानाही नुकसान भरपाई देत नसेल तर टेंडर देतांना विमा कंपनी कडून डिपाॅझिट घ्यायला हवे. त्यातून नुकसान भरपाई द्यावी. पिक विमा मंजूर शेतकऱ्यांना मंजुरीचा एसएमएस करावा. बँका नुकसान भरपाई देत नसतील तर त्यांच्या कमिशनच्या चार टक्क्यातून वजावट करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर शेतकर्‍यांच्या विविध समस्याही मांडल्यात. विधायक सुचनांचा निश्चितच शासन विचार करेल. शेतकर्‍यांसाठी विधायक जे असेल त्या गोष्टी सुचविण्याचेही मंत्री कोकाटे यांनी सुचविले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com