Maharashtra Political Live Updates : अबू आझमीपाठोपाठ आसिफ शेख यांचे वादग्रस्त विधान

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Aasif Shaikh And Abu Azmi
Aasif Shaikh And Abu AzmiSarkarnama
Published on
Updated on

Aasif Shaikh And Abu Azmi : अबू आझमीपाठोपाठ आसिफ शेख यांचे वादग्रस्त विधान

'औरंगजेब हे पवित्र इंसान होते. टोपी शिवून तो आपला उदरनिर्वाह करत होते. औरंगजेब हे सर्व धर्मांना मानणारे सर्वधर्मसमभाव असे होते. त्यांना बदनाम करण्यासाठी, राजकारणासाठी त्यांचा नावाचा उपयोग केला जात आहे', असे विधान मालेगावात मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या कॉन्फरन्सनंतर माजी आमदार आसिफ शेख यांनी केले. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यानंतर आसिफ शेख यांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा जाती-धर्मावरून ढवळून निघणार आहे.

Amol Mitkari On Abu Azmi : अबू आझमी यांच्या वारी विधानाचा अमोल मिटकरींकडून निषेध

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारी संदर्भातील केलेल्या विधानाचा राष्ट्रवादीचे (NCP) आमदार म्हणून अमोल मिटकरी यांनी निषेध केला आहे. ऐन वारीच्या वेळेवर अबू आझमी यांचं आलेलं विधान म्हणजे गालबोट लावण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केला. अबू आजमी यांना वारकरी संप्रदायाबद्दलचा ज्ञान नसल्याने त्यांनी आधी वारकरी संप्रदायबद्दल अभ्यास करावा, असा सल्ला देखील आमदार मिटकरी यांनी दिला.

BJP Adhyatmik Aghadi : महाराष्ट्रद्वेष्ट्या अबू आझमींना पाकिस्तानात पाठवून द्या; भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचा घणाघात

अबू आझमी यांच्या विधानानंतर भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडी आक्रमक झाली आहे. आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी अबू आझमी यांच् विधानाचा समाचार घेत निषेध केला आहे. महाराष्ट्रद्वेष्ट्या अबू आझमीच्या कंबरेत लाथ घालून त्याला पाकिस्तानात धाडले पाहिजे. अबू आझमी यांनी वारीमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे विधान केले आहे.

Police Update : वाहतूक पोलिस आणि वाहन चालकात भरस्त्यात हाणामारी

कल्याण-नगर महामार्गावरील शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक पोलिस (Police) आणि वाहन चालक यांच्यात भर रस्त्यात हाणामारी झाली. काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे . शहाड उड्डाणपुलावर रोजच प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांच्या बाचाबाचीचे प्रकार घडत असतात.

ShivsenaUBT Dipesh Mhatre : शिवसेना ठाकरे पक्षाचे दीपेश म्हात्रेंसह 125 जणांविरोधात गुन्हा दाखल

Dipesh Mhatre
Dipesh MhatreSarkarnama

कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढणाऱ्या शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) सेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घनकचरा कर वाढीविरोधात 9 जून रोजी केडीएमसी मुख्यालयावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोर्चा काढण्यात आला होता. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केडीएमसीचा गेट ढकलून देत मुख्यालयात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, उपनेते विजय साळवी यांच्यासह 100 ते 125 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाला आहे.

Gulab Patil On Sanjay Raut : राऊतांनी शिंदेंकडे शिवसेना 'हायजॅक'चा प्रस्ताव मांडला होता; मंत्री गुलाबराव पाटील

माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना (Shivsena) फुटली, त्यावेळेस सर्वात अगोदर संजय राऊत फुटणार होते, या विधानावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहोर उमटली आहे. "शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंकडे मांडला होता. मात्र ते त्यावेळेस थांबले. संजय राऊत सर्वात पहिले फुटणार होते", असा गौप्यस्फोट मंत्री पाटील यांनी केला.

Dhule Political Update : धुळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मविआ एकत्र लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये धुळ्यात महाविकास आघाडी (MVA) एकत्र या निवडणुका लढणार असल्याचे संकेत खासदार शोभा बच्छाव यांनी दिले आहेत. वरिष्ठ पातळीवरून त्या प्रकारचे आदेश आम्हाला मिळाले असल्याचे देखील खासदार बच्छाव यांनी स्पष्ट केले आहे.

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांंचं वारीबाबत मोठं विधान

Abu Azmi
Abu AzmiSarkarnama

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांचे वारी संदर्भात मोठं विधान केलं आहे. वारीमुळे रस्ता जाम होतो. हिंदूंचे सण साजरे केले जातात. तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र मुसलमानांनी नमाज केल्यावर तक्रारी करतात, असं विधान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केले आहे. अबू आझमी यांच्या या विधानानं राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.

Eknath Khadse : भाजपमध्ये जाणार नाही; एकनाथ खडसे यांचा पुनरूच्चार

'मी भाजपमध्ये (BJP) जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपमध्ये परत जाण्याच्या चर्चेला मी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधानी आहे, असं विधान माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे. एकनाथ खडसे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपमध्ये जाणार नसल्याचा पुनरुच्चार केला.‌

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com