Sakarnama Update : गिरीश महाजन मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री : संजय राऊत

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Sanjay Raut & Girish Mahajan
Sanjay Raut & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

शाळगडच्या मुद्द्यांवरून हिंदुत्ववादी संघटना उतरली रस्त्यावर

शाळगडच्या मुद्द्यांवरून कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरली. विशाळगडच्या उरुसावर कायम स्वरुपी बंदी घाला, या मागणीसाठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन दिवस होणाऱ्या उरुसाला पशुबळी देण्यासाठी परवानगी दिली होती.7 ते 12 जून या कालावधीत न्यायालयाने परवानगी दिली. त्यावरून बाजू मांडण्यासाठी राज्य सरकार कमी पडल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. तसेच संघटनांनी न्यायालयाच्या निकालाचाही केला निषेध केला.

सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. बडगुजर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी बडगुजर म्हणजे नाशिकची शिवेसना नाही, असे वक्तव्य केले होते. बडगुजर हे आज ठाकरेंच्या शिवसेनेते आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला देखील गैरहजर होते.

अजितदादा आम्हाला निधी देत नाही, एकनाथ शिंदेंकडे शिवसेना मंत्र्यांची तक्रार

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार हे आपल्याला निधी देत नाही. निधी नसेल तर विकासकामे कशी करायची, अशी तक्रार उपमुख्यंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्याच पक्षातील मंत्र्यांनी केली आहे. समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याने संजय शिरसाट देखील नाराज आहेत. तब्बल 400 कोटी वळवल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. तेव्हापासून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत धुसफूस सुरू आहे.

धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांप्रकरणी अंजली दमानियांची आज चौकशी

धनंजय मुंडे हे कृषिमंत्री असताना कोट्यावधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. या प्रकरमी त्यांनी एसीबीला पत्र देखील दिले होते. आपल्याकडे या प्रकरणी पुरावे असल्याचे त्यांनी म्हटले होते. आज दमानिया यांची एसीबीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दमानिया या आज चौकशीला हजर राहणार आहेत.

दोन महिला तलाठी लाच घेताना 'लाचलुतपत'च्या जाळ्यात

वडिलोपार्जित शेती पत्नीच्या नावावर करण्यासाठी 16 हजारांची लाच घेताना नांदेडमधील दोन महिला तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. भाग्यश्री तेलंगे आणि सुजाता गवळी, लाच घेणाऱ्या महिला तलाठ्यांची नावं आहेत. तलाठी भाग्यश्री तेलंगे हिने प्रथम 40 हजारांची, तर तडजोडीनंतर 17 हजारांच्या लाचेची मागणी केली. पथकाकडे याची तक्रार झाल्यानंतर रक्कम स्वीकारतानाच दोघींना पैसे घेताना पकडण्यात आले. या तलाठी महिलांच्या नांदेड व किनवट इथल्या घरांची झडती सुरू असून पोलिस ठाणे किनवट इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ranjit kasle Filed Case : रणजित कासलेवर गुन्हा दाखल

पोलिसांनी अटक केलेल्या निलंबित पीएसआय रणजित कासले कासले याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कासले याने व्हिडिओ करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते. फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आता बीड सायबर पोलिस ठाण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि बदनामीकारक पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबईतील घनसोली डेपोत उभ्या असलेल्या चार बस पेटल्या

नवी मुंबईतील घनसोली बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या इलेक्ट्रिक बसला आग लागली. यानंतर ही आग पसरत जाऊन बाजूला उभ्या असलेल्या डिजेल बसला लागली. डेपोमधील चार बस आगीत भस्मसात झाल्याची माहिती समोर येत आहे. डेपोतील बसला लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा केला जात आहे. ही आग नेमकी कशानं लागली, याचं अद्याप कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. परंतु सुरूवातीला इलेक्ट्रिक बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते.

आंदोनासाठी शिंदे-ठाकरेंची शिवसेना एकत्र 

कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष एकत्र आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील आंदोलन त्याला निमित्त ठरले आहे. दोन्ही पक्ष तसेच हिंदुत्वावदी संघटना या एकत्र येऊन या ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत.

दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी समजणार

मतदानाच्या आकडेवारीवरून नेहमीच आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. कधीकधी मतदानाची मतदानाच्या दिवशी चार ते पाच तासांनी आकडेवारी जाहीर केले जाते. कधी कधी फायनल आकडेवारी दुसऱ्या दिवशी जाहीर केले जाते. मात्र, आता दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाच्या अॅपवर जाहीर केली जाणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com