
एकनाथ शिंदेंच्या शिवेसनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यासह अहिल्यानगरमधील श्रीरामपूरच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच ठाणे जिल्ह्यातील शहपूरमधील सुमारे ७०० कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी बोलताना एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करतो, हे मुख्यमंत्री असताना मागील अडीच वर्षात महाराष्ट्रातील जनतेने पाहिलं आणि अनुभवलं. पूर्वीचे स्थगिती सरकार होते तर महायुतीचे प्रगतीचे आणि समृद्धीचे सरकार आहे, असा टोला शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
मंत्री नितेश राणे हे सातत्याने वादग्रस्त विधान करत आहेत. नुकतेच त्यांनी सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री तिथे बसला आहे. हे लक्ष्यात ठेवावे. तसेच कोणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी देशात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचे मोठे बंधु, शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी त्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिले आहे. निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, नितेश ने जपून बोलावे... मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही.
आरसीबीच्या आयपीएल विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत तब्बल 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर 60 जण जखमी झाले आहेत. मृत्यांचा कुटुंबीयांना कर्नाटक सरकारने 10 लाखांची मदत जाहीर केली होती. आता या मदतीमध्ये वाढ करत 25 लाखांची मदत पीडित कुटुंबीयांना देण्याचे आदेश मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी दिले आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता आणखी वेगवान होणार आहे. सहा पदरी असलेला हा महामार्ग आता 10 पदरी करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी 14 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये तुकडोजी महाराजांच्या समाधी परिसरात माजी आमदार बच्चू कडून करणार बेमुदत अन्नत्याग आंदोलन करणारा आहेत. शेतकरी, अपंग,शिक्षक, दिव्यांग,शेतमजूर,मच्छिमार यांच्यासाठी आंदोलन करणारा आहेत. शेतकऱ्यांची कर्ममाफी करावी, अशी कडू यांची मागणी आहे. आज अमरावती मधील संत गाडगेबाबा मंदिरा पासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधी पर्यत काढणार बाईक रॅली काढण्यात येणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांच्यातील मैत्रीचे संबंधांमध्ये दुरावा आला आहे. एकमेकांवर शाब्दिक वार ते करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये मस्क यांना शाब्दिक धमकी दिली आहे. ते म्हणाले. मस्क यांनी डेमोक्रॅटिक उमेदवारांना विशेषतः रिपब्लिकन पक्षाच्या कर विधेयकाला विरोध करणाऱ्यांना निधी दिला तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.