आरोग्य विभाग परिक्षा घोटाळ्यात मोठा मासा गळाला : राज्य सहसंचालक अटकेत

आरोग्य विभाग (Health Department) पेपरफुटी प्रकरण
Crime
Crime Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : आरोग्य विभाग (Health Department) पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांना मोठा मासा गळाला लागाला आहे. पुणे पोलिसांच्या (Pune Police) सायबर पोलिसांनी राज्याच्या तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक महेश बोटले यांना अटक केली आहे. काल अटक केलेले लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी दिलेल्या माहितीवरुन बोटले यांना आज सकाळी मुलूंडमधून ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर रात्री ९ वाजून ४० मिनीटांनी सायबर पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयीत महेश बोटले हे आरोग्य विभागाचे पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर सदस्य होते. त्यामुळे पेपर सेट करुन ज्या कॉम्पूटरवर ठेवला होता त्या कॉम्पूटरचा अॅक्सिस त्यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांनी या कॉम्पूटरमधून सेट केलेला पेपर कॉपी करुन त्यांच्या मुंबईमधील ऑफिसच्या कॉम्पूटरमध्ये ठेवला. त्यानंतर २३ किंवा २४ तारखेला तो पेपर प्रशांत बडगिरे यांच्याकडे पाठविला, असा दावा पोलिसांनी केला आहे. प्रश्नपत्रिकेतील १०० पैकी एकूण ९२ प्रश्न बोटले यांनी बडगिरेंना पाठवले असल्याचीही माहिती मिळत आहे.

Crime
हेलिकाॅप्टर अपघात : CDS बिपीन रावत यांचे निधन

सोमवारी केली होती बडगिरेंना अटक

आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यावरुन सायबर पोलिसांकडून तपास सुरू होता. प्रारंभीविजय मुऱ्हाडे, अनिल गायकवाड, बबन मुंढे, सुरेश जगताप, संदीप भुतेकर, प्रकाश मिसाळ यांना अटक करण्यात आली होती. तर सोमवारी रात्री लातुर सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे यांच्यासह ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Crime
सर्जिकल स्ट्राईक आणि २६/११ चे मैदान : अपघातग्रस्त MI-17V5 ची वैशिष्ट्ये

डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय ३६, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय ३६, रा. तितरवणे, शिरूर कासार, बीड), शाम महादू म्हस्के (वय ३८, रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय ५१, रा. शामनगर, बीड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहे. त्यामुळे आज महेश बोटले यांच्या अटकेनंतर एकूण अटक केलेल्या संशयीत आरोपींची संख्या बारा वर पोहचली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com