Mumbai News : पुरोगामी महाराष्ट्रसाठी लाजिरवाणी आकडेवारी समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालातून वर्षभरात राज्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने 2022 चा वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. यामध्ये देशात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये अधिक आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्याचा आकडा 2021 मध्ये 1,64,033 होता तो 2022 मध्ये वाढून 1,70,924 झाला आहे.
महाराष्ट्रात वर्षभरात सर्वाधिक 22 हजार 746 आत्महत्या झाल्या आहेत. यानंतर तामिळनाडूमध्ये 19,834 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. 2022 मध्ये भारतात दर तासाला 19 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांच्या घटनांमध्ये रोजंदारी मजुरांची संख्या सर्वाधिक 26.4 टक्के आहे. तर गृहिणींची संख्या 14.8 टक्के आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कर्जबाजारीपणा आणि दिवाळखोरीमुळे मोठ्या प्रमाणात लोक आपले जीवन संपवले आहे. महाराष्ट्रात दिवाळखोरी किंवा कर्जामुळे वर्षभरात 1941 आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटकात 1335 आणि आंध्र प्रदेशात 815 आत्महत्या झाल्या आहेत.
महाराष्ट्रात बेरोजगारी आणि गरिबीमुळे अनेकांनी हे पाऊल उचलले आहे. राज्यातील 642 नागरिकांनी बेरोजगारी, 402 गरिबी आणि 640 नागरिकांनी व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे आपले जीवन संपवले आहे. मात्र कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षी कौटुंबिक कारणांमुळे सुमारे 6 हजार 961 जणांनी आपले जीवन संपवले आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये देशातील एकूण आत्महत्यांपैकी 49.3 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.