HSRP Number : फक्त एकचं दिवस शिल्लक! 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल, तर आजच करा 'हे' काम!

What happens if HSRP not installed : एचएसआरपी नंबर प्लेट नसेल तर १०,००० रुपयांचा दंड होऊ शकतो. आजच बसवा, नियम आणि अंतिम मुदत जाणून घ्या.
HSRP Number Plate
HSRP Number PlateSarkarnama
Published on
Updated on

High Security Registration Plate : राज्यातील सर्व वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने सर्व वाहनांना एचएसआरपी म्हणजेच 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' बसवणे बंधनकारक केले आहे. ही नंबरप्लेट बसवण्यासाठी आता केवळ एकच दिवस उरलेला आहे. ज्यांनी अजूनही आपल्या वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही, त्यांनी तात्काळ नोंदणी करून ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा मोठ्या दंडाला सामोरे जावे लागू शकते.

परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे सक्तीचे आहे. यासाठी आतापर्यंत अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही राज्यातील मोठ्या संख्येने वाहनधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. सध्या राज्यात सुमारे 40 लाखांहून अधिक वाहने अशी आहेत, ज्यावर अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट लावलेली नाही.

मुदत संपल्यानंतरही जर वाहनावर एचएसआरपी नंबरप्लेट नसेल, तर संबंधित वाहनधारकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. काही प्रकरणांमध्ये हा दंड थेट 10,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे वाहनधारकांमध्ये सध्या मोठी चिंता पाहायला मिळत आहे. एवढ्या कमी वेळेत सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवणे शक्य नसल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

HSRP Number Plate
Vikram Rathod Quits ShivSenaUBT : शिंदे पक्षप्रमुख, खरी शिवसेना त्यांचीच, 'मविआ'कडून चक्कर मारून येताच, राठोडांची मोठी घोषणा; नीलेश लंकेंनी एका वाक्यात विषय संपवला!

राज्यात सुमारे 1 कोटी वाहनधारकांनी आधीच एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे. मात्र अजूनही सुमारे 35 टक्के वाहने या प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यांच्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतरही नियमांचे पालन न केल्यास प्रत्येकवेळी 1000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

HSRP Number Plate
BJP NMC Election : महाजनांकडून आमदार फरांदे, हिरेंना जोरदार दणका; वाजतगाजत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की

तसेच, मूळ एचएसआरपी नंबरप्लेट बसवून नंतर पुन्हा फॅन्सी किंवा वेगळी नंबरप्लेट लावल्यास 500 रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावला जाईल. हा दंड वारंवार नियमभंग केल्यास वाढत जाणार आहे. त्यामुळे कोणताही आर्थिक फटका टाळायचा असेल, तर वाहनधारकांनी आजच अधिकृत वेबसाइटवर जाऊन एचएसआरपी नंबरप्लेटसाठी नोंदणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com