BJP NMC Election : महाजनांकडून आमदार फरांदे, हिरेंना जोरदार दणका; वाजतगाजत दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की

Nashik municipal election : महापालिका निवडणुकीत नाशिकच्या निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे आहेत. त्यांचे चिरंजीव अजिंक्य फरांदे यांनी सोमवारी सकाळी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
Nashik municipal election
Nashik municipal electionSarkarnama
Published on
Updated on

Devyani Farande News : महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपची चांगली दमछाक होत आहे. नगरपालिका निवडणुकीत आमदार पत्नी नगराध्यक्ष झाल्या. मात्र अवघ्या पंधरा दिवसात भाजपला उपरती झाली आहे. खासदार-आमदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले आहे.

नाशिक शहरातील इच्छुकांची भाजपकडे मोठी संख्या आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेच्या अनेक माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी चावी फिरवली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाशिक महापालिका निवडणुकीवर पूर्ण नियंत्रण आहे. शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यासाठी ते सर्व प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. त्याचा फटका पक्षाच्याच निष्ठावंतांना बसला.

महापालिका निवडणुकीत नाशिकच्या निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे आहेत. त्यांचे चिरंजीव अजिंक्य फरांदे यांनी सोमवारी सकाळी वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील दुसऱ्या आमदार सीमा हिरे यांच्या कन्या देखील गेले वर्षभर नगरसेवक होण्याची स्वप्न पाहत होत्या. त्यांनीही सोमवारीच आमदार हिरे यांसह कुटुंबीयांसमवेत जाऊन अर्ज दाखल केला. मात्र पक्षातूनच अन्य इच्छुकांनी त्या विरोधात फोनाफोनी केली.

Nashik municipal election
Nagpur Municipal Election : शिवसेनेच्या वाट्याला 8 जागा; मात्र, त्यातील 5 जागांवरही भाजपचे उमेदवार लढणार, अभद्र युतीमुळे शिंदेसेनेत संताप

सकाळी मोठ्या उत्साहात अर्ज दाखल केलेल्या आमदार पुत्रांनी प्रचाराचे नियोजन देखील सुरू केले होते. मात्र वरिष्ठांना अचानक घराणेशाहीची आठवण झाली. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी या आमदारांना समज दिली. त्यामुळे चेहरा उतरलेल्या स्थितीत सायंकाळपर्यंत अर्ज माघारीची घोषणा करावी लागली.

दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात विविध आमदार आणि नेत्यांनी आपल्या पत्नीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली होती. नगरपालिका आणि महापालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात. मात्र या निवडणुकीचे रंगढंग आता बदलले आहेत. लक्ष्मी दर्शन सक्तीचे झाल्याने नेत्यांनी कार्यकर्त्यांना बाजूला केल्याचे चित्र होते.

Nashik municipal election
Vikram Rathod Quits ShivSenaUBT : शिंदे पक्षप्रमुख, खरी शिवसेना त्यांचीच, 'मविआ'कडून चक्कर मारून येताच, राठोडांची मोठी घोषणा; नीलेश लंकेंनी एका वाक्यात विषय संपवला!

अवघ्या दोन आठवड्यांनी भाजपला अचानक साक्षात्कार झाल्याचे दिसते. महापालिका निवडणुकीत पक्षाला घराणेशाहीची आठवण झाली आहे. अन्य पक्षातील इच्छुकांना बेसुमार प्रवेश दिल्याने त्याचा फटका निष्ठावंतांना बसला आहे. त्यामुळे आमदारांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पक्षाच्या घराणेशाहीला विरोध असलेल्या धोरणाचा फटका आमदारांना बसला आहे. सकाळी ज्या उत्साहात त्यांनी वाजत गाजत उमेदवारी अर्ज दाखल केले. तेवढ्यात निरुत्साहात सायंकाळी उमेदवारी मागे घेण्यात येईल, अशी घोषणा करण्याची वेळ त्यांच्यावर आली. भाजपच्या या धोरणाची समाज माध्यमांवरही निष्ठावंतंकडून चर्चा घडवली जात आहे. पक्षाच्या जुन्या जाणता कार्यकर्त्यांनी आणि इच्छुकांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दोष देण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com