Iqbal Singh Chahal : फडणवीस सरकारकडून आणखी एका अधिकाऱ्याला राज्यमंत्र्याचा दर्जा; निवृत्तीच्या 4 दिवस आधीच पुढील जबाबदारीची ऑर्डर

Iqbal Singh Chahal : गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंग चहल 31 जानेवारीला निवृत्त होत असून, निवृत्तीनंतर लगेचच मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्षपद स्वीकारणार आहेत.
Senior IAS officer Iqbal Singh Chahal, former BMC Commissioner and current Additional Chief Secretary (Home).
Senior IAS officer Iqbal Singh Chahal, former BMC Commissioner and current Additional Chief Secretary (Home).sarkarnama
Published on
Updated on

Iqbal Singh Chahal : ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव इकबाल सिंह चहल येत्या 31 जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांच्याकडे पुढील नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चहल यांची मुंबई पोलीस गृहनिर्माण टाउनशिप प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर ते लगेचच या पदाची सुत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे. या पदासह त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जाही देण्यात येणार आहे. चहल यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून काम केले असून त्यांना प्रशासनात काम करण्याचा 36 वर्षांचा अनुभव आहे.

राज्य सरकारने मुंबई शहर आणि उपनगरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 45 हजार सरकारी निवासस्थाने बांधण्यासाठी मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रोजेक्टला मंजुरी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ही टाऊनशिप बांधली जाणार असून यात 5 कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास केला जाणार आहे. यासाठी 20 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यातील 30 टक्के निधी सरकार तर 70 टक्के निधी एमएसआयडीसीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज म्हणून घेतला जाणार आहे. सध्या प्रकल्प सुरू करण्यासाठी महामंडळाला 100 कोटींचा प्राथमिक निधी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

सध्याच्या सरकारमध्ये निवृत्तीनंतर मंत्रिपदाचा दर्जा मिळवणारे ते दुसरे सनदी अधिकारी ठरणार आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी प्रवीण परदेशी यांना हा मान मिळाला आहे. परदेशी यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे (मित्रा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुदत 22 फेब्रुवारी 2026 रोजी संपणार होती. पण त्यांना या पदावर आणखी 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

Senior IAS officer Iqbal Singh Chahal, former BMC Commissioner and current Additional Chief Secretary (Home).
BMC Commissioner News: महापौरांसोबत मुंबई महापालिकेला मिळणार नवे आयुक्त; पती-पत्नीचे नाव चर्चेत

याशिवाय मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्षही आहेत. याआधीही ठाकरे सरकारने सीताराम कुंटे यांनाही निवृत्तीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले होते. त्यामुळे सरकार कुठलेही असले तरी ते अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधत असते हेही तितकेच खरे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com