Nana Patole News : उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर... पटोलेंचे राऊतांना प्रत्युत्तर

Political News : सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली शरद पवार पाठिंबा देतील. या संजय राऊतांच्या यांच्या या वक्तव्यानंतर तर त्यांच्या टीकेवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
Nana Patole, Sanjay Raut
Nana Patole, Sanjay RautSarkarnama

Political News : लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने ऐन निवडणुकीत वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप केले जात आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली शरद पवार पाठिंबा देतील, या संजय राऊतांच्या यांच्या या वक्तव्यानंतर तर त्यांच्या टीकेवरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.

पंतप्रधानपदाची संधी जर उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) मिळणार असेल तर त्यांना शरद पवार पाठिंबा देतील, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. राऊतांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेनी (Nana Patole) जोरदार निशाणा साधला आहे. (Nana Patole News)

Nana Patole, Sanjay Raut
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, उमेदवारी अर्जाबाबत नेमकं काय झालं?

संजय राऊत नेहमीच वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्याकडे फारसे गांभीर्याने पाहू नका. काल परवापर्यत ते राहुल गांधींना पंतप्रधान बनवायला निघाले होते, अन् आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याकडे फारसे लक्ष देऊ नका, त्यासोबतच येत्या काळात संजय राऊत यांनीदेखील वादग्रस्त वक्तव्य करणे टाळावे, असे आवाहन नाना पाटोले यांनी केले आहे.

सांगलीत मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीला

पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली, तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा थेट सवाल त्यांनी केला. देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास असून दूरदर्शन हे भाजपप्रणित झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

R

Nana Patole, Sanjay Raut
Nana Patole News : 'विशाल पाटलांची समजूत काढू, मन मोठं...' ; सांगलीवर पाणी सोडल्यानंतर नाना पटोले काय म्हणाले?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com