Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, उमेदवारी अर्जाबाबत नेमकं काय झालं?

Lok Sabha Election 2024 : सोलापूर राखीव मतदारसंघात 41, तर माढा मतदारसंघात एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांची शनिवारी (ता. 20) छाननी झाली.
Dhairyasheel Mohite Patil
Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Madha Political News : माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जाबाबत हरकत घेण्यात आली होती. धैर्यशील मोहिते पाटलांनी अर्जात आपल्या उत्पन्नाच स्राेत नमूद केला नाही, असा आरोप करण्यात आला होता. सुनावणी झाल्यानंतर ही हरकत फेटाळण्यात आल्याने धैर्यशील यांना दिलासा मिळाला आहे.

सोलापूर राखीव मतदारसंघात 41, तर माढा मतदारसंघात एकूण 42 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवारी अर्जांची शनिवारी (ता. 20) छाननी झाली. दरम्यान, माढ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील Dhairyasheel Mohite Patil, सोलापूरच्या प्रणिती शिंदे यांच्यासह महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या अर्जावरही हरकत घेण्यात आलेली आहे.

माढ्यातील राष्ट्रवादी शरद पवार Sharad Pawar गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उत्पन्नाचे स्रोत न दाखविल्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या उमेदवारी अर्जावर एका अपक्ष उमेदवाराने हरकत घेतली होती. परंतु निवडणूक अधिका-यांनी ही हरकत फेटाळत मोहिते-पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला.

सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या Praniti Shinde अर्जाला अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी हरकत घेतली आहे. शिंदेंनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांचे कलम नमूद केले नाही, असा आक्षेप घेण्यात आला आहे, तर दुसरे अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांनी, प्रणिती शिंदेंनी अर्जासोबत प्रतिज्ञापत्राद्वारे खोटी माहिती दिल्याची सांगत हरकत घेतली. तसेच शिंदे यांच्या जातीच्या दाखल्याबाबतही हरकत घेण्यात आलेली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mohite Patil
Sandipan Bhumre : छत्रपती संभाजीनगरचा महायुतीतील तिढा अखेर सुटला; संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर

भाजपचे उमेदवार राम सातपुते Ram Satpute यांच्या अर्जावर शरद पवार गटाचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाडांनी हरकत घेतली. सातपुतेंचा जातीचा दाखला बनावट असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. तर अपक्ष उमेदवार भारत कंदकुरेंनी ऊसतोड मजुराचा मुलगा म्हणवणाऱ्या सातपुतेंकडे असलेल्या वाहनांकडे लक्ष वेधले. तसेच पॅन कार्ड नसलेल्या त्यांच्या पत्नीकडे संपत्ती कशी आली, असा सवाल हरकतीद्वारे उपस्थित केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Dhairyasheel Mohite Patil
Ajit Pawar On Rohit Pawar : साहेबांचाच रोहितला विरोध होता; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं होतं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com