Maratha Kranti Morcha On Bhujbal : 'भुजबळांची मंत्रिमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा, अन्यथा..' ; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा!

Maratha Kranti Morchas Dhanaji Sakhalkar to CM Shinde : मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आग्रही मागणी
Dhanaji Sakhalkar to CM Shinde
Dhanaji Sakhalkar to CM ShindeSarakarnama

Maratha Kranti Morcha Demand Bhujbals resignation : मंत्री छगन भुजबळ हे मराठा समाजाच्या आरक्षणाला सतत विरोध करत आहेत. ओबीसी विरूद्ध मराठा असा जातीयवादही निर्माण करत आहेत. त्यामुळे छगन भुजबळ यांना संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांची मंत्री मंडळातून तातडीने हकालपट्टी करावी. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर यांनी केली आहे.

धनाजी साखळकर म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) तुम्हाला सकल मराठा समाजाच्यावतीने एवढीच विनंती करतो, की जो मंत्री संविधानिक पदावर बसून, जो शपथ घेतो की कुठल्याही समाजाचाबाबत आकस मनात धरणार नाही.'

'परंतु तोच मंत्री जर महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करत असेल आणि मराठा समाजाला कायम लक्ष्य करत असेल, मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करत असेल. तर अशा मंत्र्याला त्या संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही.'

Dhanaji Sakhalkar to CM Shinde
Video Chhagan Bhujbal : "जमाना जानता हैं हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं", भुजबळांचा जरांगे-पाटलांना इशारा

तसेच 'यामुळे माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला विनंती आहे, अशा मंत्र्याच्या पाठीत लाथ घालून त्याला आधी मंत्रिमंडळाच्या बाहेर करावं. यामुळे महाराष्ट्र सुद्धा शांत राहील आणि महाराष्ट्रातील जातीवद सुद्धा थांबेल. जर संविधानिक पदावर बसून मराठा समाजाच्या किंवा मनोज जरांगेंच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी उभा करत असेल, तर अशा मंत्र्यांना आम्ही सुद्धा महाराष्ट्रात फिरू देणार नाही.

'अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की अशा मंत्र्याची लवकरात लवकर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी.' अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

Dhanaji Sakhalkar to CM Shinde
Manoj Jarange Patil : "...तर भुजबळ मराठ्यांचे नेते बनले असते"; जरांगे-पाटील असं का म्हणाले?

छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? -

छगन भुजबळ यांनी हाके यांच्या उपोषणस्थळी भेट दिली तेव्हा "आपल्याला खूप धमक्या देण्यात येतात. पण, सगळ्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे, जमाना जानता हैं, हम किसीके बाप से भी नहीं डरते हैं," असा इशारा भुजबळांनी ( Chhagan Bhujbal ) जरांगे-पाटील यांना दिला आहे.


तसेच, "महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओबीसी कार्यकर्ते उपोषणासाठी बसले आहे. पण, आम्ही त्यांची समजूत घातली आहे. कारण, आपल्याला लढायचं आहे. लढण्यासाठी आमचे वाघ परत रस्त्यावर पाहिजेत." असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com