Imtiaz Jaleel News : `नांदेड से हमारा पुराना कनेक्शन`, इम्तियाज जलील पोटनिवडणुक लढणार!

Imtiaz Jalil will contest the Nanded Lok Sabha by-election : नांदेड जिल्ह्यात आमची संघटनात्मक बांधणी आणि ताकद आहे. महाराष्ट्रात जेव्हा एमआयएम दाखल झाली ती याच नांदेडमध्ये. पहिल्याच महापालिका निवडणुकीत आमच्या पक्षाला इथे चांगले यश मिळाले होते.
 Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Nanded Loksabha By-Election News : आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, असा एमआयएमने दिलेला प्रस्ताव काँग्रेसने नाकारला. त्यानंतर संतापलेल्या इम्तियाज जलील यांनी `आता आम्ही तुम्हाला आमची ताकद दाखवू`, असा इशारा दिला होता. तो खरा करून दाखवण्याच्या दृष्टाने लोकसभेच्या नांदेड पोटनिवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा आज माजी खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली.

विधानसभेसोबतच राज्यातील नांदेड (Nanded) लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाली. काँग्रेसने आज रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर करत दिवंगत वसंतराव चव्हाण यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली दिली. महायुतीने अद्याप नांदेडचा उमेदवार जाहीर केलेले नाही. कदाचित नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक बिनविरोध केली जाईल, अशी चर्चा आहे. मात्र एमआयएमने नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उडी घेत खळबळ उडवून दिली आहे.

नांदेडमधील एमआयएमच्या स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या होत्या. या संदर्भात इम्तियाज जलील यांना विचारणा झाली, तेव्हा त्यांनी याला दुजोरा देत मी स्वतः पुन्हा नशिब आजमावणार असल्याचे सांगितले. `नांदेड से हमारा पुराना कनेक्शन है` असे म्हणत इम्तियाज या पोटनिवडणुकीत उतरले आहेत.

 Imtiaz Jaleel News
Nanded Loksabha By-Election News : नांदेडमध्ये काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर

महाराष्ट्रात आमच्या पक्षाचा माझ्या रुपाने ऐकमेव खासदार संसदेत होता. माझ्या पराभवानंतर पक्षात आणि मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली होती. नांदेड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चालून आलेली संधी घ्यायची, असा तेथील नेते, पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्यामुळे ही निवडणुक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला असल्याचे (Imtiaz Jaleel) इम्तियाज यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यात आमची संघटनात्मक बांधणी आणि ताकद आहे. महाराष्ट्रात जेव्हा एमआयएम दाखल झाली ती याच नांदेडमध्ये. पहिल्याच महापालिका निवडणुकीत आमच्या पक्षाला इथे चांगले यश मिळाले होते. त्यामुळे नांदेड लोकसभेची पोटनिवडणुक आम्ही लढणार आहोत, असेही इम्तियाज म्हणाले. लोकसभेसोबतच आपण विधानसभा निवडणुक देखील लढणार आहोत, मात्र कोणत्या मतदारसंघातून हे आमचे नेते असदुद्दीन ओवेसी ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 Imtiaz Jaleel News
Imtiaz Jaleel Met Manoj Jarange Patil : निवडणुकीचा बिगुल वाजताच इम्तियाज जलील अंतरवालीत धडकले

काँग्रेसचा खेळ बिघडणार?

एमआयएमने अचानक नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसने सोबत न घेतल्याचा सूड या निमित्ताने एमआयएम काँग्रेसवर उगवत आहे का? की मग महायुतीचा लोकसभेला झालेला पराभव जिव्हारी लागल्यामुळे जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी एमआयएमला बळ दिले? अशी शंका उपस्थितीत केली जात आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी भाजपमध्ये प्रेवश केला होता.

अशोक चव्हाण यांच्यासारखा दिग्गज नेता सोबत असल्यामुळे भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय निश्चित समजला जात होता. मात्र महाविकास आघाडीने वसंतराव चव्हाण यांना मैदानात उतरवले आणि महायुतीला धोबीपछाड दिला. या पराभवामुळे अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गेलेली पत पुन्हा मिळवण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लीम मते रोखण्यासाठीच एमआयएमचा पर्याय उभा करण्यात आल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात एमआयएमच्या या निर्णयामागे नेमकं कोण आहे? हे स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com