Maha Vikas Aghadi : 'MVA' मध्ये जागा वाटपाचा 'निकष' ठरला; किती जागा कोणाच्या वाट्याला येणार, याची उत्सुकता!

Curious as to how many seats will be allotted to whom according to the seat allocation criteria of the Mahavikas Aghadi : 'मविआ'च्या जागा वाटपासाठी उद्या सोमवारपासून मुंबईत मॅरेथॉन बैठका होत असून, जागा वाटपाचा निकष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला आहे.
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाविकास आघाडीच्या उद्या सोमवारपासून (ता. 1) जागा वाटपावरून दोन दिवसा मॅरेथॉन बैठका होणार आहे. जागा वाटपाचा निकष काय असेल, कोणत्यापद्धतीने होणार, कोणाच्या वाट्याला किती, महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांबरोबर असलेल्या त्यांच्या छोट्या मित्र पक्षांच्या वाट्याला किती, अशा सर्वांच प्रश्नांची उत्तरे उद्यापासून सुरू होत असलेल्या मॅरेथॉन बैठकांमध्ये चर्चेली जाणार आहेत.

या जागा वाटपाचा निकष एकच असेल, तो म्हणजे, संबंधित जागेवर महाविकास आघाडीतील पक्षाचे आणि तेथील उमेदवारांचे 'मेरीट'! त्यामुळे जागा वाटपात कोणत्या पक्षाला किती जागा येतात, याची उत्सुकता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन गेले. विधानसभेची मुदत २८ नोव्हेंबर असून, तत्पूर्वी निवडणुका होतील, असे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिलेत. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांच्या बैठकांना वेग आला. महायुतीमधील मित्र पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल रात्री वर्षांवर बैठक झाली. या बैठकाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार होते. ही बैठक पहाटपर्यंत सुरू होती, असे सांगितले जात आहे.

Maha Vikas Aghadi
Nana Patole : 'MVA'ची जागा वाटपाची फायनल तारीख ठरली; नाना पटोलेंनी मॅरेथॉन बैठकांचा विषय सांगितला

महायुतीमधील या बैठकीनंतर आता महाविकास आघाडीमध्ये उद्या सोमवारपासून दोन दिवस मॅरेथॉन बैठका मुंबईत होत आहे. या बैठकांमध्ये जागा वाटप निश्चित करण्याचा मानस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला. या बैठकीत कोणाच्या वाट्याला किती जागा येतील हे महत्त्वाचे नसून, जागा वाटप होताना त्या जागेवर 'मेरीट' तपासलं जाणार आहे, असा निकष असल्याचे नाना पटोले यांनी सांगितलं. त्यामुळे कोणती जागा कोणाला मिळेल, याची उत्सुकता आहे. यातून कोणच्या वाट्याला किती जागा येतील, हे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. यात शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आक्रमक भूमिका पाहता, महाविकास आघाडीत जागा वाटप होताना, पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maha Vikas Aghadi
BJP Vs Shiv Sena : खंजीर कुणी खुपसली? शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये जुंपली...

पक्ष नेतृत्वाच्या मनातील उमेदवार ओळखला जाणार

'मविआ'त जागा वाटप 'मेरीट'नुसार होणार आहे. ही बैठक फक्त जागा वाटपासाठी आहे. उमेदवार निश्चितीसाठी नाही. उमेदवारीचा निर्णय जागा वाटपानंतर आपपाल्या पक्षातील नेतृत्वाखाली होणार आहे. त्यामुळे उमेदवारीचा तिढा पक्ष पातळीवर रंगणार असून, तिथं वेगळीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. जागा वाटपात पक्षाचं 'मेरीट' हा निकष लावल्यानं, पक्ष नेतृत्वाच्या मानातील उमेदवार तिथंच निश्चित होतो, असे देखील जाणकारांचे निरीक्षण आहे. त्यामुळे जागा वाटपावरून बहुतांशी उमेदवारांचे चेहरे निश्चित होतील, असे देखील सांगितलं जात आहे.

मुंबई, कोकणाबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचा वेगळा प्रस्ताव

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुंबई आणि कोकणाविषयी महाविकास आघाडीकडे वेगळी मागणी केली आहे. या मागणीचे पडसाद उद्याच्या महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये उमटण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई आणि कोकणात आमच्याकडे जास्त जागा सोडून इतर ठिकाणावरील जागावाटप महाविकास आघाडीत निश्चित करावं, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या प्रस्तावानं पेच निर्माण झाला आहे. परंतु नाना पटोले यांनी यावर चर्चा सुरू आहेत, एवढीच प्रतिक्रिया दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्यापासूनच्या मॅरेथॉन बैठकांमध्ये काय निर्णय घेतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com