Pankaja Munde in Maharashtra Sadan : एनडीएच्या बैठकीत पैठणीच्या फेट्यांचा थाट अन् नाशिक ढोलचा दणदणाट..

BJP News : खासदार डाॅ. प्रीतम मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी महाराष्ट्र सदनात सोबत फोटो देखील काढले.
Pankaja Munde in Maharashtra Sadan News
Pankaja Munde in Maharashtra Sadan NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एनडीएतील घटक पक्षांची बैठक दिल्लीत महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आली होती. (Pankaja Munde in Maharashtra Sadan) या बैठकीच्या नियोजनाची जबादारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्यावर सोपवण्यात आली होती.

Pankaja Munde in Maharashtra Sadan News
Rahul Gandhi Speech : मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींचा तुफान हल्लाबोल!

या बैठकीत सहभागी होणाऱ्या एनडीएतील मित्रपक्ष आणि त्यांच्या नेते, खासदारांच्या स्वागतासाठी भारती पवार यांनी खास नाशिकच्या पैठणीचे फेटे मागवले होते. एवढेच नाही तर या नेत्यांचे स्वागत खास नाशिकच्या प्रसिद्ध ढोल वादनाने करण्यात आले. त्यामुळे (Maharashtra) महाराष्ट्र सदनातील एनडीएच्या या बैठकीवर नाशिकची छाप दिसून आली.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डाॅ. भारती पवार (Bharti Pawar) यांनी खास नियोजनाची तयारी पाहण्यासाठी आमंत्रित केले होते. पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र सदनात बैठकीच्या ठिकाणी भेट दिली तेव्हा त्यांचे देखील स्वागत नाशिक ढोलच्या दणदणाटात करण्यात आले. पैठणी फेटे घातलेल्या महिला खासदारांचा रुबाब काही निराळच असल्याची भावना पंकजा मुंडे यांनी या निमित्ताने व्यक्त केली.

महाराष्ट्र सदन दिल्ली येथे एनडीएच्या बैठकीचे नियोजन मंत्री डाॅ. भारती पवार यांच्याकडे होते. यावेळी नाशिकच्या पैठणीचे फेटे सर्वांना बांधण्यात आले होते, आणि आपला खास नाशिक ढोल तिथे होता. त्या सर्वांच्या आग्रहास्तव मी तिथे त्यांचे सादरीकरण पाहण्यासाठी गेले आणि त्यांना प्रोत्साहन दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी खासदार डाॅ. प्रीतम मुंडे आणि पकंजा मुंडे यांनी महाराष्ट्र सदनात सोबत फोटो देखील काढले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com