Rahul Gandhi Speech : मणिपूरमध्ये मोदी सरकारने भारत मातेची हत्या केली; राहुल गांधींचा तुफान हल्लाबोल!

Rahul Gandhi On No Confidence Motion : मणिपूरमध्ये हिंसा रोखल्याशिवाय, भारत मातेची दुर्दशा थांबणार नाही.
Rahul Gandhi Speech
Rahul Gandhi Speech Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरत आहे.केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधींनी यांनी मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल केला आहे. (Rahul Gandhi On No Confidence Motion)

Rahul Gandhi Speech
Kolhapur Politics : दिग्गज नेते असूनही पक्ष संघटनेत स्थान नाही; स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना!

राहुल गांधी, "मी काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण प्रधानमंत्री अजूनही गेले नाहीत. कारण त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नाही. मी मणिपूरबद्दल बोलतोत. मणिपूर आज वाचलं नाहीये. त्याला तुम्ही तोजलं आहे. त्याचे दोन तुकडे केले आहेत. मी मणिपूरच्या रिलिफ कँपमध्ये गेलो होतो. तेथील महिलांशी बोललो तिकडच्या मुलांशी संवाद साधला."

गांधी पुढे म्हणाले, "मणिपूरमध्ये मी एका महिलेशी बोललो. बहन, काय घडलं तुमच्यासोबत? त्या म्हणाल्या की, माझ्यासमोर माझ्या मुलाला बंदुकीतून गोळी मारण्यात आली. मी पूर्ण रात्र मुलाच्या पार्थिवासोबत होते. मला भीती वाटली, मी माझं घर सोडलं. आता माझे कपडेच माझ्याजवळ राहिलं आहे. एक फोटो दाखवून ती महिला म्हणते की, हेच राहिलं आहे माझ्याकडे. अजून एक महिलेला प्रश्न विचारल्यावर ती थरथर कापत होती. थरथर कापत ती बेशुद्ध झाली. मी फक्त दोन उदाहरण दिलं."

Rahul Gandhi Speech
Ashok Chavan On Rahul Gandhi: राहुल गांधी बुलंद आवाजाने लोकसभा पुन्हा दणाणून सोडतील..

"मणिपूरमद्ये मोदी सरकारने भारताची हत्या केली. हिंदुस्थानची हत्या केली. भारत मातेची हत्या केली आहे. तुम्ही हिंसा थांबवत नाही, तोपर्यंत भारत मातेची हत्या होणे थांबणार नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com