Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची शक्यता आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी याआधी निर्दोष मुक्तता केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी छगन भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी देखील दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. (Chhagan Bhujbal News)
भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. दमानिया यांनी केलेल्या या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून सोमवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damniya) यांनी याबाबत ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांना निर्दोष सोडण्यात आले होते. या प्रकरणातील डिस्चार्जला आव्हान देणारे अपील गेली दीड वर्ष ऐकले जात नव्हते. पाच न्यायाधीशांनी ‘नॉट बिफोर मी’ असे म्हटले होते. त्यानंतर शेवटी प्रकरण सोमवारी हे प्रकरण अनुक्रमांक १२ वर न्यायमूर्ती मोडक यांच्यासमोर ठेवण्यात आले आहे.
भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटामधून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना रोखरक्कम लाचेच्या स्वरुपात मिळाल्याचा आरोप होता. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाने भुजबळांविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. भुजबळांना मिळालेली क्लीनचिट कायम राहणार की? न्यायालय पुन्हा शिक्षा सुनावणार, याकडे लक्ष लागले आहे.