Amit Thackeray : महापुरुषांबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? अमित ठाकरेंचा राज्यकर्त्यांना परखड सवाल

MNS News : हरलो तर राजसाहेब हरले आणि जिंकलो तर मनसे पक्ष जिंकला असं म्हटलं जातं.
Amit Thackeray
Amit Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

हेमंत पवार

Amit Thackeray On Politics : महापुरुषांचा आदर्श घेऊन आपण पुढील वाटचाल करतो. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, पाणी, रस्त्यांचे प्रश्न आहेत. मात्र त्याचा विषय कोणी काढला की महापुरुषांविषयी कोणीतरी काहीही बोलतो आणि मूळ विषयाला बाजुला सारले जाते. महापुरुषांबद्दल बोलायची आपली लायकी आहे का? असा परखड सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अमित ठाकरे म्हणाले, राजसाहेब ठाकरे यांच्या एवढा महाराष्ट्र फिरलेला नेता मी पाहिलेला नाही. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा एसटीचा प्रश्न प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करु. मनसे (MNS) वाढीसह विद्यार्थी संघटना बांधणीस महाराष्ट्रभर दौरा सुरू आहे. त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तसेच यावेळी त्यांनी शिवसेना-मनसे एकत्र येणार नाही. मुंबई महापालिकेत आमची कोणाची युती होईल का नाही हे माहीत नाही. मात्र, मनसेने स्वबळावर निवडणुकीसाठी तयारी केली असल्याचेही अमित ठाकरेंनी (Amit Thackeray) यावेळी सांगितले.

यावेळी मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, धैर्यशील पाटील, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, राजेंद्र केंजळे, शहराध्यक्ष सागर बर्गे, तालुकाध्यक्ष दादा शिंगण, नितीन महाडीक आदी उपस्थित होते.

Amit Thackeray
Nashik Graduate News; निरूत्साहाचा फटका तांबेंना की पाटील यांना बसणार?

शिवसेना व मनसे एकत्र येणार का? या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, शिवसेना व मनसे एकत्र येणार का असा प्रश्न वारंवार विचारला जातो, मात्र त्यात सत्य नाही आणि ते शक्यही नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत तयारी असेल तर मनसे या निवडणुका स्वतंत्रपणे लढवेल अशी घोषणा केला आहे. तसेच हरलो तर राज ठाकरे हरले आणि जिंकलो तर पक्ष जिंकला असं म्हटलं जातं. मनसेला फक्त पंधरा वर्षांचे आयुष्य आहे.

राजकारणात संयम महत्त्वाचा आहे. राजकारणात येणाऱ्या युवकांनी संयम ठेवण्याची तयारी ठेवली पाहिजे. राजसाहेबांनी सांगितले तर राजकारणात नक्की येईन असंही अमित ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Amit Thackeray
Asaram Bapu Case: आसाराम बापू दोन बहिणींवरील बलात्कार प्रकरणात दोषी,न्यायालय शिक्षा ठोठावणार

महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी दिवशी शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या दिल्या जातात. त्या सुट्ट्या का दिल्या जातात त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही चांगले काम करत आहेत परंतु राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे सत्ता दिल्यानंतर अधिक चांगले काम होईल याचा मला विश्वास आहे.

मीडियानं तारतम्य ठेवावं..

शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी, नोकरी, बेरोजगारी, पाणी प्रश्नासंदर्भात कोणी बोलायला तयार नाही. त्याऐवजी महापुरुषांची बदनामी करायची आणि विषय बदलयाचा असे सध्या राज्यात सुरु आहे. हे महाऱाष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. महापुरषांबद्दल अपमान केला जातो हे मीडियावाल्यांनी दाखवणेच बंद केले पाहिजे असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.

विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद...

विद्यानगर येथे मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या शाखेचे उद्घाटन अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यासाठी महाविद््यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी उपस्थिती लावुन ठाकरे यांना मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांना दिवसभर विद्यार्थ्यांशी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याची विदयार्थ्य़ांची क्रेझ होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com