Supriya Sule : सिनेमासाठी पहिल्या रांगेचं तिकीट घेतो की बाल्कनीचं? ठाकरेंचा अपमान झाल्याच्या टीकेवरून सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

Uddhav Thackeray Seating Row Controversy : इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीतील बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे ठाकरेंचा अपमान झाल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
Supriya Sule
Supriya Sule clarified that Uddhav Thackeray was seated comfortably at the INDIA alliance meeting in Delhi, dismissing BJP’s claims of disrespect.Sarkarnama
Published on
Updated on

INDIA alliance meeting Delhi : इंडिया आघाडीच्या नवी दिल्लीतील बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे ठाकरेंचा अपमान झाल्याची टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

मात्र हे प्रकरण भाजपच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीचे फोटो भाजपने शेअर केलेत. ज्यामध्ये बैठक व्यवस्थेवरून भाजपने उद्धव ठाकरेंवर टीका केली. बैठकीत ठाकरेंचा अपमान झाल्याचा दावा भाजप प्रवक्त्यांनी केला आहे.

योगायोग म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या बैठकीचे फोटो शेअर केलेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र तसेच कर्नाटक निवडणुकीत केलेल्या घोटाळ्याचे बहुचर्चित प्रेझेंटेशन त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना गुरुवारी दिले. त्या बैठकीत कोणताही प्रोटोकॉल नव्हता. प्रेझेंटेशन चांगले दिसेल अशा खुर्चीवर प्रत्येकजण सोयीने बसला होता, असं स्पष्टीकरण शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.

Supriya Sule
Solapur Crime : जुन्या वादाचा सूड! शरद पवारांच्या समर्थकाकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण

या संपूर्ण प्रकरणावर बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, या बैठकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव दुसऱ्या रांगेत तर तेजस्वी यादव तिसऱ्या रांगेत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील तिसऱ्या रांगेत बसले होते. ती बैठक नसून राहुल गांधी यांनी केलेले प्रेझेंटेशन पाहण्याचा कार्यक्रम होता. त्यात कोणताही प्रोटोकॉल नव्हता.

Supriya Sule
Supriya Sule Politics: ‘प्रांजल खेवलकर प्रकरणात मोबाईल डेटा चाकणकरांकडे गेला कसा?’, सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न

उलट उद्धव ठाकरे हे अतिशय योग्य आणि चांगल्या ठिकाणी बसले होते. त्यांना प्रेझेंटेशन उत्तम प्रकारे पाहता आले. पहिल्या रांगेतील लोकांना काहीच दिसले नसावे. आपण सिनेमाला जातो तेव्हा पहिल्या रांगेचे तिकीट घेतो की बाल्कनीचे? याचा सारासार विचार भाजपने करायला हवा, असं म्हणत भाजपने उद्धव ठाकरेंचा अपमान झाला या आरोपाची खासदार सुळे यांनी अक्षरशः पिसे काढली.

कालच्या बैठकीत स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल गांधी यांनी पत्रकारांना दाखविलेल्या प्रेझेंटेशन विषयी उत्सुकता दाखवली. प्रेझेंटेशन आम्हाला पाहायचे आहे, असे आवर्जून विविध नेत्यांनी सांगितले. राहुल गांधींनी देखील त्याची तयारी केलेली होती. त्यामुळे सगळ्यांना हे प्रेझेंटेशन दाखविण्यात आल्याचं सुळेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com