Solapur Crime : जुन्या वादाचा सूड! शरद पवारांच्या समर्थकाकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं अपहरण

Gopichand Padalkar Worker Kidnapping : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Gopichand Padalkar’s worker Sharnu Hande
Solapur Police with Gopichand Padalkar’s rescued worker Sharnu Hande, abducted over an old dispute, highlighting rising political tensions.Sarkarnama
Published on
Updated on

Solapur News, 08 Aug : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्राच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या कार्यकर्त्याच जीव थोडक्यात बचावला आहे. शरणु हांडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याचं सांगण्यात येत आहे. संशयित आरोपीने याआधी आमदार पडळकरांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती आता समोर आली आहे. सोलापूर पोलिसांना पडळकरांचा समर्थक शरणू हांडे यांच्या अपहरणची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ 4 पथक शोधासाठी रवाना केली.

Gopichand Padalkar’s worker Sharnu Hande
Chandrashekar Bawankule: संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावे असलेल्या जमिनीची महसूल विभाग चौकशी करणार! बावनकुळेंचं मोठं विधान

त्यानंतर गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास अमित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी सुरवसे याला ताब्यात घेतलं त्यावेळ शरणु हांडे हा गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्याला सोलापुरात आणलं.

जुन्या वादातून अपहरण

या अपहरणामागे जुना वाद असल्याचं आता समोर आलं आहे. आरोपी अमित सुरवसेने 2021 साली गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली होती. याचा राग मनात धरत शरणु हांडेने सुरवसेला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

Gopichand Padalkar’s worker Sharnu Hande
Sanjay Shirsat News: संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओचा शिरसाटांनी घेतला मोठा धसका; म्हणाले,'आता बेडरुमच काय...'

हा वाद हांडे आणि सुरवसे यांनी आपापसात मिटवला होता. मात्र, मारहाणीचा आणि अपमानाचा राग मनात धरत बदला घण्याच्या उद्देशाने अमित सुरवसे पुण्यातून भाड्याने कार घेतली. त्यानंतर तो मित्रांसोबत सोलापुरात आला आणि शरणु हांडेचं अपहरण केलं.

या प्रकरणी अमित सुरवसेसह इतर 6 जणांवर हत्येच्या उद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर पोलिसांची आणि जखमी कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी आज सोलापुरातं येणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com