

Rohit Pawar News : 'जगाची चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गावर असलेली आपली अर्थव्यवस्था एका वर्षातच सहाव्या क्रमांकावर घसरली असून युके आणि जपानच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत चौथी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज IMF ने दिला असता संपूर्ण देशभर स्वतःची वाहवा करून घेणारे केंद्र सरकार आज आपला देश पुन्हा सहाव्या स्थानावर घसरल्याच्या IMF च्या अंदाजावर गप्प का आहे ? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे.
केंद्र सरकारची धरसोडीची धोरणे त्यांच्या आश्वासनाप्रमाणेच अत्यंत अस्थिर (volatile) असल्यानेच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
'केंद्र सरकार यामागचे कारण जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत सांगत आहे. जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा मात्र नव्या पद्धतीमुळे अचूकता (accuracy) येईल, अचूक मोजणी करता येईल असे सांगणारे केंद्र सरकार आज जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आपल्या अपयशाचे खापर फोडत आहे, हे दुर्दैवी नाही का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
'केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा !.
महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले. त्याचा भाजपला मोठा झटका बसला. दरम्यान, या पराभवाचे देखील भाजपकडून भांडवलभांडवल करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर जगात कुणीच नसेल, अशी टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणा विषयी ते म्हणाले, सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करुन त्यावर आगामी तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का, यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो.. या तिन्ही ठिकाणी कमळ काही फुलणार नाहीच, पण एकमात्र खरंय की, आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार-चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तमिळनाडूमध्ये DMK, प. बंगालमध्ये TMC आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस युतीची सत्ता येणार असल्याचा तर २०२९ मध्ये देश INDIA आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला..!
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.