नवाब मलिकांचा सूचक इशारा, बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी...

नवाब मलिक यांचे ट्विट पाहता ते आज कोणता खुलासा करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत
Nawab Malik
Nawab Malik
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सातत्याने भाजप आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. मात्र आज (३ नोव्हेंबर) त्यांनी नवं ट्वीट करत सूचक इशारा दिला आहे. “बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे” असं नवाब मलिक यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने भाजप आणि एनसीबीवर आरोप करताना दिसत आहेत. किरण गोसावी पासून समीर वानखेडेंपर्यंत त्यांनी नवनवीन खुलासे केले आहेत. आता त्यांच्या या ट्विटमधून त्यांनी पुन्हा एकदा सूचक इशारा दिल्याचे दिसत आहे. तसेच आता त्यांच्या निशाण्यावर कोण असेल याबाबत तर्कवितर्क काढण्यात येत आहे.

Nawab Malik
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूजाचा मोठा गौप्यस्फोट

- नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अडकवण्यात आले आहे, समीर वानखेडे यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन नोकरी मिळवली, वानखेडे यांनी स्वत: ची आर्मी तयार करुन खोट्या केसेस दाखल करुन बॉलीवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवले असे एक ना अनेक आरोप मलिकांकडून करण्यात येत आहेत. कालदेखील त्यांनी समीर वानखेडे यांच्याबाबत मोठा आरोप केला. समीर वानखेडे यांचे कपडे, शूज, घड्याळे लाखो रुपयांची असतात, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच, भाजपची समीर वानखेडेंना पाठबळ असल्याचाही आरोप केला आहे.

- नवाब मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ

नवाब मलिक यांनी बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने नोकरी मिळव्याचा दावा केला. त्याबाबत त्यांनी काही कागदपत्रेही सोशल मिडीयावर शेअर केली. या आरोपांनंतर आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एनसीबीच्या महासंचालकांकडून वानखेडेंच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्यामार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

- आरोप प्रत्यारोपांची मालिका

एकीकडे नबाव मलिक सातत्याने समीर वानखेडेंवर आरोप करत असताना दूसरीकडे भाजप कडून समीर वानखेडे यांना समर्थन दिले जात आहे. समीर वानखेडेंच्या समर्थनार्थ भाजप नेतेही नबाव मलिकांच्या आरोपांना उत्तर देत आहेत. समीर वानखेडे यांनी जानेवारी २०२१ मध्ये नवाब मलिक यांच्या जावयावर कारवाई केली होती. या कारवाईत ते ८-९ महिने तुरुंगात होते. याच सूजबुद्दीतून नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत असल्याचे भाजप नेते म्हणत आहे.

- वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकर आणि बहिण यास्मिन वानखेडेंचा पलटवार

नवाब मलिकांच्या आरोपांवर वानखेडेंची पत्नी आणि बहिणी यास्मिन वानखेडेंही या युद्धात उतरल्या आहेत. नवाब मलिकांच्या प्रत्येक आरोंपावर त्या पलटवार करताना दिसत आहेत. वानखेडे यांनी कोणतेही चूकीचे काम केले नसल्याचे स्पष्टीकरण क्रांती रेडकर आणि यास्मिन वानखेडे यांनी दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com