आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूजाचा मोठा गौप्यस्फोट

गोसावीने प्रभाकर साईलचा नंबर समीर नावाने सेव्ह केला होता
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूजाचा मोठा गौप्यस्फोट
Published on
Updated on

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील सॅम डिसोझाने (Sam D'Souza) आज पुन्हा मोठा खुलासा केला आहे. आर्यन खानकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आले नव्हते. किरण गोसावीला (Kiran Gosavi) पैशांचा व्यवहार करायचा होता, त्याबाबत गोसावीकडून मिळालेल्या सुचनेनुसार सुनील नावाच्या व्यक्ती हे काम करत होता. असे नवे खुलासे सॅमने केले आहेत. सोमवारी (१ ऑक्टोबर) एका वृत्तवाहिनीशी बोलताना सॅमने हे गौप्यस्फोट केले आहेत.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीच्या बॉडीगार्डने प्रभाकर साईलने सॅम डिसोझा आणि गोसावी यांचे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा केला होता. त्यानंतर यात सॅम डिसोझाचे नाव पुढे आले. आर्यनला सोडवण्यासाठी जी डील झाली, त्यात शाहरुखकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते, त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार असल्याचेसाईलने म्हटले होते. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने ही डील केली होती.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सॅम डिसूजाचा मोठा गौप्यस्फोट
भाजपचे खासदार आमच्यावर टीका करतात, त्यांनी एक मुतारी तरी बांधली का?

- सॅम डिसूजा काय म्हणाला

अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप सॅम डिसोझावर करण्यात आला आहे. या प्रकरणी बोलताना सॅम म्हणाला की, आर्यन खानला यातून बाहेर काढण्यासाठी गोसावीने शाहरुख च्या मॅनेजरकडून ५० लाख रुपये घेतले होते. पण गोसावी फ्रॉड असल्याचे लक्षात येताच मी त्याला पैसे परत करायला सांगितले. मात्र या डिलमध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कोणतीही भूमिका नसल्याचे डिसूजाने सांगितले.

तीन ऑक्टोबरच्या पहाटे मी, किरण गोसावी आणि पूजा ददलानी आणि तिचा पती यांना भेटलो. लोअर परेल हे भेटीचे ठिकाण ठरले होते. ही भेट झाल्यानंतर मी तेथून निघून गेलो आणि नंतर गोसावीने आर्यनला सोडवण्यासाठी दादलानीकडून ५० लाख रुपये घेतले. लोअर परळमधील भेटीदरम्यान गोसावीला समीर नावाच्या व्यक्तीचा फोन आला. पण गोसावीने त्याच्या मोबाइलमध्ये प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडे नावाने सेव्ह होता, म्हणजेत त्याने आपण समीर वानखेडे यांच्याशी बोलत असल्याचे भासवले.

सॅमने पुढे सांगितले की, त्यानंतर मी ट्रू कॉलरवर चेक केले असता तो नंबर प्रभाकर साईलचा होता. गोसावीचा खोटेपणा माझ्या लक्षात आला. या भेटीनंतर काही तासांतच मी गोसावीवर दबाव आणून पैसे परत देण्यास भाग पाडले.

मात्र या छाप्याशी आपला काहीही संबंध नाही. एक ऑक्टोबरला सुनील पाटील या पॉवर ब्रोकरचा मला फोन आला होता. २ ऑक्टोबरला होणाऱ्या कॉर्डेलियावर ड्रग्जपार्टी विषयी त्याच्याकडे माहिती होती. पाटीलने मला एनसीबीला ही माहिती देण्यास सांगितले. म्हणून मी गोसावीला फोन करून दोघांची ओळख करून दिली,' असेही सॅम डिसूजाने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com