Sanjay Raut On Sharad Pawar News
Sanjay Raut On Sharad Pawar NewsSarkarnama

Sanjay Raut On Sharad Pawar: मोदींसोबत व्यासपीठावर बसणे पवारांना शोभणार नाही, चुकीचा संदेशही जाईल..

Shivsena (UBT) :राष्ट्रवादीचे एवढे नुकसान झाले असताना त्यांच्या प्रमुखांनी अशा कार्यक्रमाला जाणं शोभत नाही.
Published on

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडली. एवढेच नाही तर राष्ट्रवादी हा सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोपही केला. अशावेळी शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत व्यासपीठावर बसणे त्यांना शोभणार नाही. शिवाय यामुळे चुकीचा संदेश देखील जाईल, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

Sanjay Raut On Sharad Pawar News
PM Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला युवा काँग्रेसचा विरोध; बॅनरबाजीतून साधला थेट निशाणा

उद्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पुणे दौऱ्यावर आहेत. टिळक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे, तसेच विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. देशात मोदी सरकारविरोधातील आघाडीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पंतप्रधान या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येत असल्याने राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या संदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केली असून पंतप्रधान मोदींच्या पुरस्कार सोहळ्याला शरद पवारांच्या हजेरीने चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पाडली नाही, तर पंतप्रधानांनी हा पक्ष सर्वात भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे, याची आठवण देखील राऊत यांनी या निमित्ताने पवारांना करून दिली आहे.

राष्ट्रवादीचे एवढे नुकसान झाले असताना त्यांच्या प्रमुखांनी अशा कार्यक्रमाला जाणं शोभत नाही, अशी नाराजी राऊत यांनी व्यक्त केली आहे. असाच काहीसा सूर काॅंग्रेसच्या नेत्यांकडून देखील निघत आहे. शरद पवार त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा, असे आवाहन काॅंग्रेस नेत्या माजी मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील केले आहे.

महाविकास आघाडी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय, त्याचा निषेध करतोय.अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाही, त्यांच्यासोबत व्यासपीठावर जाणे हे कितपत योग्य आहे ? असा प्रश्न देखील गायकवाड यांनी उपस्थितीत केला. शरद पवार यांना काँग्रेस तर्फे आवाहन आहे, की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असेही गायकवाड म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com