PM Narendra Modi Pune Visit: नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला युवा काँग्रेसचा विरोध; बॅनरबाजीतून साधला थेट निशाणा

Youth Congress Opposes Modi's Pune Visit: पंतप्रधान मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहे.
Youth Congress Opposes Modi's Pune Visit
Youth Congress Opposes Modi's Pune VisitSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचे दिसत आहे. युवक काँग्रेसकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत, यामुळे काँग्रेस भाजपमधील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंतप्रधान मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर येत आहे. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन करणार आहे. विशेष म्हणजे, त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कारानेही गौरविण्यात येणार असून याच दिवशी ते शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालाही भेट देणार आहेत.

Youth Congress Opposes Modi's Pune Visit
Satyapal Malik Statement: सत्तेसाठी भाजप- नरेंद्र मोदी राममंदिरावरही हल्ला करवू शकतात ; सत्यपाल मलिकांचा दावा

दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या या दौऱ्याला विरोध करत त्यांना शहरात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरच्या माध्यमांतून "मन की बात बंद करो मणिपूर की बात करो","गो बॅक क्राईम मिनिस्टर",प्राईम मिनिस्टर गो टू मणिपूर, फेस द पार्लमेंट" देश जळत असताना पुरस्काराच्या मेजवान्या कशासाठी," अशा आशयाचे संदेश या बॅनर्सवर दिसून येत आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार देण्यात येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आम आदमी पक्षासह, काँग्रेसच्या काही युवा पदाधिकारी आणि स्थानिक नेते आपण त्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी विनंती करण्यासाठी शरद पवार यांची भेट घेणार आहे.

Youth Congress Opposes Modi's Pune Visit
Sharad Pawar On Tilak Puraskar Sohla: मोदींच्या व्यासपीठावर पवार ; काँग्रेसला पोटदुखी शिवसेना नेत्यांना मळमळ

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मणिपूर संदर्भात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचारावर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर धुमसत असून नरेंद्र मोदी त्यावर चकार शब्हही बोलत नसल्याने विरोधकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. नरेंद्र मोदींना राजस्थानातील सीकरला जाण्यास वेळ आहे पण मणिपूरवर बोलण्यास वेळ नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

त्यामुळे, विरोधी पक्षांच्या इंडिया फ्रंट' नरेंद्र मोदींच्या १ ऑगस्टच्या दौऱ्यात सकाळी११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहे. इतकेच नव्हे तर, पुणेकरांनीही काळे कपडे घालून या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन इंडिया फ्रंटच्या वतीने करण्यात आले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com